मालवण : मालवण तालुक्यातील असरोंडी गावात ताटरबाव ते धनगरवाडी या रस्त्यावर चिरेखाण व्यावसायिकाने खोदाई सुरू केली आहे. त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. १५० लोकवस्ती असलेल्या धनगरवाडीचा मार्गच बंद झाल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना दोन ते अडीच किलोमीटर दगड मार्गातून पायपीट करावी लागत आहे.दरम्यान, तेथील ग्रामस्थांनी सोमवारी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांची भेट घेत व्यथा मांडली. शासकीय दप्तरी २६ नंबरला नोंद असलेल्या मार्गावर चिरेखाण खोदाई करून रस्ता बंद करणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई करून रस्ता मोकळा करून मिळावा. अन्यथा उपोषण छेडण्याचा इशारा धनगरवाडी ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार यांच्यासह गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.यावेळी गंगाराम शिंगाडे, ठकू कोकरे, अंकुश जंगले, नागेश कोकरे, मोहन परब, गणेश शिंगारे यांसह अन्य ग्रामस्थ तसेच असरोंडी शिवसेना शाखाप्रमुख सुनील सावंत, कणकवली उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, किसन मांजरेकर आदी उपस्थित होते.रस्त्यावर चिरेखाण खोदाईस १५ दिवस झाले. या दरम्यान ग्रामपंचायत असरोंडी व सरपंच यांना लेखी अर्ज देण्यात आला. मात्र त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.धोकादायक मार्गअसरोंडी धनगरवाडी ग्रामस्थांना मुख्य मार्गापर्यंत जाण्यासाठी असलेला मार्ग बंद झाल्याने दगड मार्गातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे निसरडा झालेल्या दगडावर घसरून काही मुले पडली आहेत. काही मुले भीतीमुळे शाळेतही जात नाहीत. आजारी व वृद्ध माणसे यांना चालणे अवघड बनले आहे.
रस्त्यावरच चिरेखाण, असरोंडी धनगरवाडी ग्रामस्थ उपोषण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 11:51 AM
मालवण तालुक्यातील असरोंडी गावात ताटरबाव ते धनगरवाडी या रस्त्यावर चिरेखाण व्यावसायिकाने खोदाई सुरू केली आहे. त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. १५० लोकवस्ती असलेल्या धनगरवाडीचा मार्गच बंद झाल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना दोन ते अडीच किलोमीटर दगड मार्गातून पायपीट करावी लागत आहे.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांवर पायपीट करण्याची नामुष्की असरोंडीत रस्त्यावरच चिरेखाण