कणकवली : काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत रहा. आगामी काळात पुन्हा एकदा काँग्रेस हा जनतेच्या मनातील पक्ष व्हावा यासाठी नियोजनबद्ध संपर्क अभियान हाती घेण्याबरोबरच पक्ष संघटन मजबूत करा. असे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.कणकवली तालुका काँग्रेसची मासिक सभा बुधवारी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली . यावेळी ते बोलत होते. यावेळी नागेश मोर्ये, ईर्षाद शेख, महिंद्र सावंत, एच . बी . रावराणे, प्रदीप मांजरेकर, सुनिता म्हापणकर, प्रविण वरुणकर , बी. के. तांबे, किरण टेंबुलकर , निलेश तेली, प्रदीप तळगावकर ,प्रदीपकुमार जाधव , चंद्रकांत पवार पंढरी पांगम, विजय कदम , संदीप कदम , महेश तेली , प्रविण सावंत , रविंद्र डगरे , अमोल साटम, संतोष तेली , प्रमोदीनी कुडतरकर, निलेश मालंडकर , बंटी मेस्त्री , भिवाराम परब, डॉ, प्रमोद घाडीगांवकर , अजू मोर्ये आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .यावेळी कणकवली तालुका कार्यकारीणीचा विस्तार करण्याचे ठरविण्यात आले. तसेच लवकरच कणकवली तालुक्यातील गावोगावी जाऊन कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेऊन पक्ष संघटना मजबुत करण्याचे ठरविण्यात आले. १८ नोव्हेंबर नंतर तालुक्याचा दौरा करण्यात येणार आहे. विशेष कार्यकारी पदासाठी कार्यकर्त्यांनी नावे द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले.यावेळी कणकवली शहर अध्यक्ष म्हणून महेश तेली तर कणकवली तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून अमोल साटम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे अभिनंदन जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व ईर्षाद शेख यांनी केले. तालुक्यातील विकास कामे कार्यकर्त्यांनी सुचवावी. त्याला लवकरात लवकर मंजूरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. असे आश्वासन बाळा गावडे यांनी यावेळी दिले.कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी पक्ष कार्याचा आढावा यावेळी मांडला. संतोष नाईक यांची ह्युमन राईटस जिल्हाध्यक्ष व मनोज तोरसकर यांची जिल्हा निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत वाळके व जेष्ठ समाजवादी कार्यकर्ते बापू नेरुरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
काँग्रेस हा जनतेच्या मनातील पक्ष होण्यासाठी संघटन मजबूत करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 2:06 PM
Congress, kankvali, sindhudurgnews काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत रहा. आगामी काळात पुन्हा एकदा काँग्रेस हा जनतेच्या मनातील पक्ष व्हावा यासाठी नियोजनबद्ध संपर्क अभियान हाती घेण्याबरोबरच पक्ष संघटन मजबूत करा. असे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
ठळक मुद्देकाँग्रेस हा जनतेच्या मनातील पक्ष होण्यासाठी संघटन मजबूत करा !बाळा गावडे यांचे आवाहन : कणकवली तालुका काँग्रेस बैठक