कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत आचारसंहिता व नियमांचे पालन सर्वांनी करत निवडणूक शांततेत पार पाडण्यास सहकार्य करावे. सोशल मीडियावरून प्रचार करताना आचारसंहितेचे पालन करा. तक्रारीनंतर दोषी आढळल्यास संंबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कुडाळचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बोेंबले यांनी दिली. कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक १७ एप्रिल रोजी जाहीर झाली असून, यासंदर्भातील नियोजनासंदर्भात सर्वांना माहिती व्हावी, याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बोंबले यांनी प्रांत कार्यालय येथे सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी तसेच अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भाजपचे जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, भाजप जिल्हा सरचिटणीस संतोष शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, आरपीआय तालुकाध्यक्ष आत्माराम कुडाळकर, अनिल कुलकर्णी, सदानंद अणावकर, मनसेचे बाळा पावसकर, तहसीलदार अजय घोळवे, तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता पी. एस. झेंडे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोंबले म्हणाले, कुडाळ नगरपंचायतीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. १७ ते २२ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ आॅनलाईन नाही, तर अर्ज पारंपरिक पद्धतीनेचदोडामार्ग व वैभववाडी तसेच राज्यातील इतर नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रेही आॅनलाईन करून घेण्यात आली होती. मात्र, यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कुडाळ नगरपंचायत व इतर ठिकाणी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आॅनलाईन नाही, तर पारंपरिक पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती बोंबले यांनी दिली.स्वतंत्र परवानगीकक्ष स्थापणार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ठिकठिकाणी लावण्यात येणारे बॅनर, जाहिराती व अन्य प्रसिद्धी माध्यमांकरिता प्रत्येकाकडे परवानगी असणे आवश्यक आहे. याकरिता परवानगी कक्ष कुडाळ तहसील कार्यालयात स्थापन करण्यात येणार असल्याचे बोंबले यांनी सांगितले.
आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2016 11:32 PM