मालवण : मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात रविवारी कोविड लस घेतली. ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत २ हजार ३८४ जणांनी कोविड लस घेतली आहे. शहरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता नगराध्यक्षांनी चिंता व्यक्त करीत व्यापारी, नागरिक, पर्यटकांनी कोविडच्या सर्व नियमांचे कडक पालन करावे, अशा सूचना केल्या आहेत.शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविडसदृश लक्षणे दिसल्यास संबंधितांनी तपासणी करून घ्यावी. जे रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींनी तपासणी करून घ्यावी. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने जे निर्बंध घातले आहेत त्याचे सर्वांनी पालन करावे.शहरात अनेक व्यापारी, विक्रेते मास्कचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर असून व्यापारी संघाने याबाबत सर्व व्यापार्यांचे विक्रेत्यांचे प्रबोधन करावे. कोरोनाचा प्रसार वाढल्यास प्रशासनास कठोर निर्णय घ्यावा लागल्यास त्याचा परिणाम व्यवसायांवर होऊ शकतो. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी व्यापार्यांनी पुन्हा घरपोच सामान पोचविण्यावर भर द्यावा, असे आवाहन कांदळगावकर यांनी केले आहे.गेल्या वर्षभरात पालिका प्रशासनाच्यावतीने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या. नागरिक, व्यापार्यांचे याला चांगले सहकार्य लाभले. आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी, पर्यटकांची जबाबदारी वाढली आहे. सर्वांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई प्रशासनाकडून केली जाईल. तसेच पालिकेत अत्यावश्यक काम असल्यासच नागरिकांनी यावे, असेही कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.
कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 12:30 PM
Corona vaccine Malvan Sindhudurg-मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात रविवारी कोविड लस घेतली. ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत २ हजार ३८४ जणांनी कोविड लस घेतली आहे. शहरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता नगराध्यक्षांनी चिंता व्यक्त करीत व्यापारी, नागरिक, पर्यटकांनी कोविडच्या सर्व नियमांचे कडक पालन करावे, अशा सूचना केल्या आहेत.
ठळक मुद्देकोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करामहेश कांदळगावकर : व्यापारी, नागरिकांना आवाहन