सावंतवाडी : गेले दोन दिवस सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओटवणे पंचक्रोशीला झोडपून काढले. पावसासोबत वाहणाºया सोसाट्याच्या वाºयामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली.
गेले काही दिवस जिल्ह्यात पावसाचा लपंडाव सुरू आहे. सोमवारी व मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ओटवणे-सावंतवाडी मुख्य रस्त्यावर ओटवणे मंदिराशेजारील माडाचे भले मोठे झाड सकाळी रस्त्यावर उन्मळून पडले. त्यामुळे ओटवणे-सावंतवाडी वाहतूक सुमारे पाच तासांसाठी ठप्प होती.
सकाळच्या वेळेस झालेल्या या प्रकारामुळे सकाळच्या वेळेस घरातून कामावर जाण्यासाठी निघालेल्या ग्रामस्थांचे हाल झाले. हा प्रकार ओटवणे ग्रामस्थांच्या लक्षात येताच नरेंद्र कविटकर, रवींद्र कोटकर, परशुराम नाईक, बाबी