मिलिंद पारकर - कणकवली -येथील उपजिल्हा रूग्णालयातील शस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलन झाले. त्यानंतर भूलतज्ज्ञ डॉ. पराग नायगांवकर आणि डॉ. ज्ञानेश्वर सोडल यांनी शासकीय सेवा बंद केली. भूलतज्ज्ञांअभावी महिनाभर शस्त्रक्रिया ठप्प झाल्या असून, सर्वसामान्य रूग्णांना खासगी रूग्णालयांचा भुर्दंड बसतो आहे.येथील उपजिल्हा रूग्णालयात २८ जानेवारी रोजी गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेदरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला होता. यानंतर उपजिल्हा रूग्णालयात आंदोलन झाले होते. त्यानंतर डॉ. सोडल व डॉ. नायगावकर या दोघांनीही शासकीय सेवा थांबवली आहे. त्यामुळे उपजिल्हा रूग्णालयातील शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. भूलतज्ज्ञाअभावी शस्त्रक्रिया करणे शक्य नाही. उपजिल्हा रूग्णालयात कणकवलीसह वैभववाडी, देवगड, मालवण येथील रूग्ण येतात. या सर्व रूग्णांना आता खासगी रूग्णालयांची वाट धरावी लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर उपाययोजना करण्याची मागणी जनतेतून होत आहे. दरम्यान, या प्रकारानंतर अधीक्षकांनी दोन दिवसांत भूलतज्ज्ञांची नेमणूक होणार असल्याचे सांगितले होते. कुडाळ येथील भूलतज्ज्ञांची आॅर्डरही निघाली होती. मात्र, भूलतज्ज्ञ हजर न झाल्याने रूग्णांची परवड होत आहे. अवकाळीचे पंचनामे नाहीतसलग तीन दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील बागायती, शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत. फोंडाघाट येथे अवकाळी पावसानंतर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आणि संभाव्य संकटाची चाहूल मिळाली. तालुक्यातील शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रतीक्षा यादीत ६५८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. आमसभेकडे लक्षविधानसभा मतदारसंघातील देवगड, वैभववाडी तालुक्याच्या आमसभा फेब्रुवारी महिन्यात पार पडल्या. कणकवली तालुक्याची आमसभेची तारीख जाहीर होऊन नंतर ही सभा रद्द झाली. मार्च महिन्यात ही सभा होणार असल्याचे सांगण्यात आले. आता ही सभा केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चोऱ्यांचा तपास रखडलाशहर व परिसरात झालेल्या घरफोड्यांचा तपास रखडला आहे. घरफोडीची अनेक सत्रे होऊनही पोलिसांना या चोऱ्यांच्या तपासात कोणतीही प्रगती करता आलेली नाही. कासार्डे हायस्कूल चोरीप्रकरणाचा उलगडा होऊन हायस्कूलच्या विद्यार्थ्यासह तीन युवकांना जेरबंद करण्यात आले. पोलीस यंत्रणेची ही एकमेव जमेची बाजू म्हणावी लागेल.
उपजिल्हा रूग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग ठप्प
By admin | Published: March 10, 2015 11:18 PM