शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

'कणकवली पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन अधिकृत की अनधिकृत?'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2021 4:29 PM

कणकवली पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा विषय चर्चेचा ठरला.

कणकवली : कणकवली पंचायत समितीच्या नूतन इमारतीत प्रथमच सर्वसाधारण सभा होत आहे. पण या इमारतीचे उद्घाटन अधिकृतपणे झाले की अनधिकृतपणे ? याचे उत्तर प्रभारी गटविकास अधिकारी यांनी द्यावे. अशी मागणी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत यांनी केली. त्यामुळे सभागृहातील अधिकारी काहीसे गोंधळले.मात्र, या उद्घाटनाबाबत सभेत ठराव घेतला होता. हे तुम्हाला माहीत नाही का ? तुम्ही किंवा इतर काही लोकांनी जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या उद्घाटनाबाबत  पत्र दिले आहे ना? असा प्रतिप्रश्न सभापती मनोज रावराणे यांनी केला. तसेच त्याबाबत आम्हाला खुलासा विचारला जाईल तेव्हा त्याचे निश्चितपणे उत्तर देऊ. असे सांगत या मुद्यांवरील चर्चेवर पडदा टाकला. कणकवली पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा विषय चर्चेचा ठरला.आज, बुधवारी परमहंस भालचंद्र महाराज सभागृहात सभापती मनोज रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. यावेळी उपसभापती प्रकाश पारकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अभिजित हजारे, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, सुजाता हळदिवे, हर्षदा वाळके, मंगेश सावंत, महेश लाड, मिलींद मेस्त्री, दिव्या पेडणेकर,गणेश तांबे यांच्यासह अन्य पंचायत समिती सदस्य व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.नवीन इमारत उदघाटनाचा मुद्दा मंगेश सावंत यांनी उपस्थित केल्याने सुरुवातीपासून शांततेत चाललेल्या या सभेतील वातावरण बदलले. याबाबत काय उत्तर द्यायचे असा प्रश्न सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना पडलेला असतानाच सभापती रावराणे यांनी उत्तर दिल्याने. त्या मुद्यावर पडदा पडला. या सभेत १५ वा वित्त आयोग व अन्य विषयावर चर्चा झाली. आरोग्य विभागाच्या चाललेल्या कामांबाबत माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी दिली. एमआरजीएस योजनेतील काम करताना दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सुजाता हळदिवे यांनी केला. त्यावर गुरांचे गोठे व अन्य कामे चालू आहेत. निधीची कमतरता असल्याने कामात अडथळे येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.प्रधानमंत्री आवास योजनेनंतर्गत  घरांची यादी कोणती असणार आहे ? असा प्रश्न सदस्यांनी विचारला असता ग्रामसभेत ठरलेली नावांच्या यादीची छाननी केली जाईल. बेघर असलेल्या लोकांना प्राधान्य दिले जाईल. तसेच पडझड झालेल्या घरात राहणाऱ्या लोकांना प्रथम या योजनेचा लाभ द्यावा,अशी मागणी सुजाता हळदीवे यांनी केली.जमिनीचे बक्षीसपत्र करताना लाभार्थी यांना अडचणी येत आहेत. आपल्या भागात सर्वच सातबारा सामाईक आहेत, त्यावेळी डेटा इन्ट्री मारताना अडचणी येतात. त्यामुळे त्या लाभार्थीचे नुकसान होत आहे. सार्वजनिक विकासासाठी अडचणी आहेत, त्यावर काय मार्ग निघेल? यावर चर्चा सभागृहात करावी अशी मागणी माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनी केली. सभापती रावराणे यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढुयात असे सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली