वेंगुर्ले : मालवण तालुक्यातील तारकर्ली-देवबाग कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेत येथील वेंगाबॉईजच्या डॉ. प्रल्हाद मणचेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, डॉ. राजेश्वर उबाळे आणि डॉ. अमेय प्रभुखानोलकर यांनी २१ किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पार केले.युनायटेड स्पोर्ट्स अँड अॅडव्हेंचर्स कंपनीने ही स्पर्धा ५, १० व २१ किलोमीटर अशा अंतराच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यातील ५ किलोमीटरच्या स्पर्धेत डॉ. मयुर मणचेकर, डॉ. महेंद्र्र सावंत यांनी यशस्वी सहभाग नोंदविला. वेंगाबॉईजच्या सदस्यांना डॉ. रावराणे, डॉ. शंतनू तेंडुलकर आणि डॉ. प्रशांत मडव यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या स्पर्धेत सहभागी होऊन लोकांमध्ये जास्तीत जास्त व्यायाम, धावणे व चालण्याची आवड निर्माण व्हावी, हा संदेश डॉ. प्रल्हाद मणचेकर तसेच प्रदीप वेंगुर्लेकर यांनी दिला.रणरणत्या उन्हात स्पर्धकांचा लागला कसबीट दी हिट या संकल्पनेवर आधारित ऐन उन्हाळ््यात भरवण्यात आलेल्या या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांच्या क्षमतेचा कस लागला. धावताना १२ किलोमीटरनंतर स्पर्धकांना उष्माघात सहन करावा लागला. तर १५ किलोमीटरनंतर मात्र स्पर्धकांची चांगलीच दमछाक झाली. या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेंगाबॉईजच्या चारही सदस्यांनी २१ किलोमीटरचे अंतर लीलया पार केले.
कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेत डॉक्टरांचे यश, २१ किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 2:53 PM
मालवण तालुक्यातील तारकर्ली-देवबाग कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेत येथील वेंगाबॉईजच्या डॉ. प्रल्हाद मणचेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, डॉ. राजेश्वर उबाळे आणि डॉ. अमेय प्रभुखानोलकर यांनी २१ किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पार केले.
ठळक मुद्देकोस्टल मॅरेथॉन स्पर्धेत डॉक्टरांचे यश २१ किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पार