कनेडी : कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थीनिर्मित वैज्ञानिक प्रतिकृतीमध्ये माध्यमिक विद्यालय नाटळच्या ओंकार गणेश खांडेकर याच्या हवा शुद्धिकरण यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तांबे एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित करंजे, नागवे, साकेडी पंचक्रोशी विद्यालय करंजे येथे हे प्रदर्शन भरविले होते. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी या प्रतिकृतीची निवड करण्यात आली आहे.वातावरणामध्ये होणारे हवेचे प्रदूषण हे ६० ते ७० टक्के वाहनांमुळे होते. ते कमी करण्यासाठी या फिल्टरचा उपयोग होईल. वाहनांमधून बाहेर पडणारा कार्बनडाय आॅक्साईड व कार्बन मोनोआॅक्साईड फिल्टरमध्ये अडकून राहतो व स्वच्छ हवा बाहेर पडते. या यंत्रामध्ये स्पंज वापरला जातो. तो दर ३०० ते ४०० किलोमीटरला बदलावा लागतो. त्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. हे पाणी १०० ते २०० किलोमीटर बदलावे लागते. अत्यंत अल्पखर्चिक असा हा फिल्टर प्रत्येक डिझेल वाहनाला बसविता येतो. गणेश खांडेकर याच्या यशाबद्दल संस्थाचालक, मुख्याध्यापक दत्तात्रय मुंडले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या वैज्ञानिक प्रतिकृती बनविण्यासाठी सुनील मेस्त्री यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)
विज्ञान प्रदर्शनात नाटळ शाळेचे यश
By admin | Published: December 15, 2014 7:53 PM