ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 20 - माजी आमदार विजय सावंत यांच्या शिडवणे येथील नियोजित साखर कारखान्यास सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नियमानुसार सहकार्य करावे असे पत्र आमदार नितेश राणे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना दिले आहे.
दरम्यान, साखर कारखान्याच्या प्रश्नावरुन पुन्हा एकदा सिंधुदुर्गात राणे व सावंत यांच्यात कललगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
> माजी आमदार विजय सावंत यांनी काही दिवसापूर्वी आपल्या साखर कारखाना उभारणीत "राणे व्हेंचर्स"चा अडथळा येत असल्याचा आरोप केला होता. तसेच जिल्हा बँकेने साखर कारखान्याला कर्ज द्यावे अशी मागणी केली होती. यापार्श्वभूमिवर आमदार नीतेश राणे यांनी जिल्हा बँक अध्यक्षाना पत्र लिहिले आहे.
> या पत्रात म्हटले आहे की, वैभववाडी तसेच कणकवली तालुक्यात ऊस उत्पादनाचे क्षेत्र वाढत आहे.त्यामुळे जिल्ह्यात साखर कारखाना होणे ही काळाची गरज आहे.
> विजय सावंत यांच्या नियोजित साखर कारखान्यात राणे व्हेंचर्स अडथळे आणत आहे.असा आरोप फक्त गैरसमज पसरविण्यासाठी माजी आमदार सावंत करीत आहेत.
> या साखर कारखान्यामुळे खरोखरच जर जनतेची सोय होत असेल तर आणि १० हजार बेरोजगारांना रोजगार मिळत असेल तर राणे व्हेंचर्स तर्फे कोणताही अडथळा यापुढे त्यांना येणार नाही. आजच्या घडिला विजय सावंत यांच्या साखर कारखाना उभारणीस वित्तीय संस्था पतपुरवठा करीत नाहीत. त्यामुळे
> पतपुरवठ्यामुळेच त्यांचा साखर कारखाना रखडला आहे. असे ते म्हणतात.
> त्यामुळे जिल्ह्यातील उस उत्पादक शेतकरी व ग्रामीण भागातील बेरोजगारांचे हित लक्षात घेवून साखर कारखान्याच्या उभारणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने पुढाकार घ्यावा.तसेच नियमानुसार विजय सावंत यांच्या कारखान्याच्या उभारणीस सहकार्य करावे.असेही या पत्रात नीतेश राणे यांनी म्हटले आहे.