दोडामार्ग : कसई-दोडामार्ग धाटवाडी येथील विनायक फोंडू गवस (५५) यांनी राहत्या घराच्या बाजूला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.दोडामार्ग शहरात धाटवाडी येथे विनायक गवस यांचे घर आहे. या ठिकाणी ते आपल्या कुटुंबासह राहतात. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने आजारपणाच्या तणावाखाली होते. याच नैराश्यातून त्यांनी सोमवारी रात्री घराच्या बाजूला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांचे कुटुंबीय घरातच होते. बाहेर येऊन पाहतात तर विनायक गवस गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. याबाबतची माहिती पोलिसांना कळविताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मात्र, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. काही महिन्यांपासून ते आजारी असल्याने त्या तणावाखाली आत्महत्या केली असल्याचे व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, वृद्ध आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
कसई-दोडामार्ग येथील वृद्धाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 2:47 PM
कसई-दोडामार्ग धाटवाडी येथील विनायक फोंडू गवस (५५) यांनी राहत्या घराच्या बाजूला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
ठळक मुद्देकसई-दोडामार्ग येथील वृद्धाची आत्महत्याआजारी असल्याने तणावाखाली आत्महत्या