सुधीर राणेकणकवली : तालुक्यातील जानवली येथील प्रसिद्ध भजनी बुवा शशिकांत राणे यांनी सामाजिक भान राखत गणेशोत्सवात एक अनोखा उपक्रम राबविला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भजनी मंडळांना एकत्र येऊन भजन करण्यास बंदी होती. त्यामुळे त्यांनी एकट्यानेच विविध ठिकाणी गणरायासमोर आपली भजन कला सादर केली. तसेचया माध्यमातून त्यांना जे मानधन मिळाले त्यातून जिवनावश्यक वस्तू खरेदी करून गरीब कुटुंबांस व अणाव येथील आनंदाश्रमास त्यांनी अर्पण केल्या.कोकणात गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.भजन,कीर्तन,नामस्मरण दिवस रात्र केले जाते . परंतु यावर्षी कोरोनाच्या काळात एकत्र येवून भजनी मंडळास भजन करण्यास बंदी होती. ️
अशा वेळी भजन रसिकांच्या निमंत्रणावरून गावा गावात जावून एकट्याने,कधी हातपेटी , कधी मृदंग स्वतः वाजवून स्वतःच रचलेली गाणी गात शशिकांत राणे बुवांनी आपली भजन रूपी सेवा गणरायाच्या चरणी अर्पण केली. या माध्यमातून जे मानधन मिळाले त्यातून जिवनावश्यक वस्तू खरेदी करून गरीब कुटुंबांस व अणाव येथील आनंदाश्रमास त्यांनी अर्पण केल्या.जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर , विजय राणे , उत्तम परब यांच्या हस्ते अणाव येथे जावून या वस्तू आनंदाश्रमास देण्यात आल्या . यावेळी स्वतः शशिकांत राणे बुवा उपस्थित होते. भजनातून मिळालेले मानधन वृद्धाश्रमास दान करून शशिकांत राणे बुवांनी आपली सामाजिक तळमळ या माध्यमातून दाखवून दिली. त्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.