आचरा : फिशरीज अधिकाऱ्यांनी कारवाई करून सील केलेल्या होड्या पारंपरिक मच्छिमारांच्या जमावाने हल्ला करीत जाळल्या. जर प्रशासनाच्या ताब्यातील होड्या जाळून आम्हाला मारहाण होते, तर यापुढे हे पारंपरिक मच्छिमार आम्हाला जीवे मारल्याशिवाय सोडणार नाहीत, अशी व्यथा आचरा पर्ससीनधारकांनी राड्याप्रकरणी पाहणी करण्यासाठी आलेल्या माजी पालकमंत्री नारायण राणे यांच्याकडे मांडली. यावेळी नारायण राणे यांनी पर्ससीनधारकांना धीर देत आपण कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. मी पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे, असे सांगितले.यावेळी आचरा भेटीवर आलेल्या माजी पालकमंत्री राणे यांनी हल्लेखोरांच्या राड्यात नुकसानग्रस्त मच्छिमारांची भेट घेत जळलेल्या होड्या, जाळी, इंजिने यांची पाहणी केली. हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष संदेश सावंत, अशोक तोडणकर, नीलिमा सावंत, अशोक गावकर, राजन गावकर, विनायक परब, हनुमंत प्रभू, अभय भोसले, संतोष कोदे, हिमाली अमरे, प्रकाश वराडकर, चंदन पांगे, जेरोन फर्नांडिस, सचिन हडकर, अभिजित सावंत, विजय कदम, शेखर कांबळी, आदी उपस्थित होते.कर्तव्यदक्ष असणाऱ्या आचरा पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांची बदली करण्याचा राजकीय पुढारी घाट घालत असल्याची तक्रार किशोर तोडणकर यांनी माजी पालकमंत्री नारायण राणे यांच्याकडे केली. यावेळी राणे यांनी जीव धोक्यात घालून हल्ला परतविणाऱ्या महेंद्र शिंदे व चार पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करीत हा बदलीचा प्रकार मी होऊ देणार नाही. तुम्ही मच्छिमार बांधवांनी निश्चिंत रहा, असे सांगितले. (वार्ताहर)मच्छिमारांना धीरयावेळी माजी पालकमंत्री राणे म्हणाले की, एवढ्या क्रूरतेने हल्ला करण्याएवढे कोण येथे परप्रांतीय नव्हते. आपल्या माणसांवर हल्ला होणे ही दुर्दैवाची बाब आहे. पूर्णपणे आपल्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांनी मच्छिमार बांधवांना धीर दिला.
पर्ससीन मच्छिमारांच्या पाठीशी
By admin | Published: November 08, 2015 11:30 PM