सावंतवाडी : गेल्या पंचवीस वर्षात कोकण रेल्वेकडे कोणीच लक्ष दिले नसताना सुरेश प्रभू यांच्या रूपाने कोकण रेल्वेत मोठा आमुलाग्र बदल पहायला मिळाला. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसही त्यांच्यामुळे होत आहे. असे असतानाही सुरेश प्रभू यांच्यावर शिवसेनेकडून झालेली टीका दुुर्दैवी असल्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत सागितले.सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन रेल्वेमंत्री आणि विद्यमान केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दुसऱ्या टप्प्याचे काम बंद आहे. त्यामुळे प्रभू यांनी लोकांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. याबाबत तेली यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर निशाणा साधला.ते म्हणाले, या आधीचे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी, नितीशकुमार यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस होणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र सुरेश प्रभू रेल्वेमंत्री होताच त्यांनी टर्मिनस मंजूर क रून त्याचे कामही सुरू केले. मात्र हे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्याबाबत आपण सुरेश प्रभूंचे लक्ष वेधले असता प्रभूंनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधून कामाला गती देण्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे हे काम लवकरच सुरू होईल.
प्रभूंनी आपल्या कार्यकाळात नवी १२ रेल्वेस्थानके आणली. विद्युतीकरणासाठी ८८ कोटी तसेच रेल्वे दुपदरीकरणासाठी ४०० कोटींची तरतूद केली. लोकांची मागणी लक्षात घेऊन वैभववाडी-कोल्हापूर, चिपळूण, कराड हे नवे मार्ग मंजूर केले. असे असताना सुरेश प्रभू लोकांची फसवणूक करत असल्याचा शिवसेनेचा आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार शिवसेनेचेच आहेत. असे असताना शिवसेनेने आपले निवेदन स्टेशनमास्तरांना देणे दुर्दैवी आहे. याकडे पालकमंत्री किंवा खासदारांचे लक्ष वेधले असते तर त्यांना संबंधित अधिकाऱ्याना सूचना देण्याचे किंवा बैठक घेण्याचे अधिकार आहेत.राणेंच्या रुग्णालयाला मंजुरी द्यागोवा मेडिकल कॉलेजमधील शुल्क आकारणीबाबत आपण जिल्ह्यात येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार आहोत. गोव्याच्या धर्तीवर येथील रूग्णांना दीनदयाळ उपाध्याय आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी करणार आहे.शिवाय येथील जनतेचे हित लक्षात घेता नारायण राणे यांच्या रूग्णालयाला तत्काळ मंंजुरी देण्याची मागणी आपण करणार आहोत. तसेच या रूग्णालयात रूग्णांना जास्त खर्च होऊ नये यासाठी शासनाने या रूग्णालयाला पैशांची तरतूद करावी, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.