शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

सुशील वेल्हाळ यांचे निधन

By admin | Published: February 10, 2016 10:20 PM

हृदयविकाराचा झटका : सर्वसामान्यांचा नेता हरपला

शृंगारतळी : सर्वसामान्य लोकांसाठी अहोरात्र झटणारा सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या सुशील तथा आप्पा वेल्हाळ यांचे मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ठाणे येथून घरी परतत असताना प्रवासातच चिपळूण तालुक्यातील घोणसरे येथे त्यांची प्राणज्योत मालवली. आठवडाभरापूर्वी म्हणजेच दोन फेब्रुवारीला त्यांनी आपला ६५ वा वाढदिवस साजरा केला होता.त्यांच्या अचानक जाण्याने सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता हरपला असल्याची जनभावना निर्माण झाली आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी बाजारपेठ व महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते.दोन दिवसांपूर्वी पत्नी सुचिता वेल्हाळ यांच्या नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ते ठाणे येथे गेले होते. तपासणीनंतर श्रीवर्धन येथे आपल्या सासरवाडीत पत्नीला सोडून रात्री शृंगारतळीकडे घरी परत येत होते. रात्री वाहन चालविण्यास त्रास होत असल्याने त्यांनी शृंगारतळी येथून पाटपन्हाळे महाविद्यालयातील कर्मचारी संदीप चव्हाण यांना बोलावून घेतले होते. संदीप चव्हाण यांची लोणावळयात भेट झाली. सुशील वेल्हाळ यांनी पत्नी सुचिता यांना दूरध्वनी करून ‘आता काळजी करू नको, संदीप आला आहे,’ असे सांगितले व पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.पहाटे गणेशखिंड तांबी येथे वेल्हाळ यांना पहिला झटका आला. त्यांना आपल्या छातीत तीव्र वेदना होत असल्याची जाणीव झाल्याने त्यांनी घोणसरे येथील मित्र नंदू गोंधळी यांना फोन करून कल्पना दिली. घोणसरे येथे आल्यानंतर एका खासगी रुग्णालयात स्वत: चालत गेले. त्याठिकाणी बाथरुमला गेले व परत येऊन स्ट्रेचरवर झोपताच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची खबर पोहोचताच अनेकजणांनी घोणसरे गाठले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना मार्गताम्हाणे येथे शैक्षणिक संस्थेच्या उद्घाटनासाठी आले होते. कार्यक्रम संपवून जाताना त्यांनी अचानक चालकाला गाडी सुशील वेल्हाळ यांच्या घराकडे वळविण्यास सांगितले व घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे, गोविंदराव निकम, आदी राजकीय पुढाऱ्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते.गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील वरिष्ठ महाविद्यालयात उपाध्यक्ष म्हणून नुकतीच जबाबदारी स्वीकारली होती. महाविद्यालयात विशेष कामगिरी करण्याचे स्वप्न त्यांच्या अचानक जाण्याने मागे पडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा गौरव, अवधूत, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी शेकडोंचा जनसमुदाय लोटला होता. सकाळच्या सत्रात शृंगारतळी बाजारपेठेत अक्षरश: पाय ठेवण्यासाठी जागा नव्हती. इतक्या मोठ्या संख्येने लोक ‘आप्पां’ना निरोप देण्यासाठी आले होते. (वार्ताहर)शरद पवार आज शृंगारतळीतसुशील वेल्हाळ यांच्या निधनाचे वृत्त कळल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज, गुरुवारी सकाळी शृंगारतळीमध्ये दाखल होणार आहेत. मुंबई येथून हॅलिकॉप्टरने सकाळी दहा वाजता दाभोळ वीज कंपनी येथे दाखल होतील. यानंतर १०.१५ वाजता शृंगारतळी येथील सुशील वेल्हाळ यांच्या निवासस्थानी भेट देतील.तेथून ते गुहागरचे माजी सभापती नंदकिशोर पवार यांच्या निवासस्थानी भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी चिपळूणमध्ये जाणार आहेत .