शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बनावट कॉल्सचा सुळसुळाट

By admin | Published: September 16, 2016 9:30 PM

पोलिसांकडून जागृती : नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे

मालवण : अलीकडील काही काळात बनावट कॉल्सचे प्रमाण वाढले आहे. याबाबत जनजागृती करूनही सुशिक्षित नागरिक फसले जात आहेत. कॉल करणाऱ्या संबंधित कंपनीकडून दाखविण्यात येणाऱ्या आर्थिक प्रलोभनांना अनेकजण बळी पडत असून, त्यांच्यावर पश्चात्ताप करत बसण्याची वेळ आली आहे. बनावट कॉल्सचा सुळसुळाट फार वाढला असून विविध आर्थिक आमिषांची गाजरे दाखवून क्षणार्धात ‘कंगाल’ करण्याची किमया बनावट कॉल्सधारक करत आहे. याबाबत पोलिसांकडून वारंवार जागृती केली जात असली तरी बनावट कॉल्सच्या मुळापर्यंत पोहोचण्यास यश मिळाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे अशा कॉल्सचा धुमाकूळ थांबणार तरी कधी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.मालवण शहरातील अनेक जणांना आॅगस्ट महिन्यात बनावट कॉल्सनी हैराण केले होते. सर्वसामान्यांसह शिक्षक, प्राध्यापक, पोलीस, राजकीय पदाधिकारी यांना अशा पद्धतीने कॉल्स आले होते. मात्र, यातील एकानेही त्यांच्या प्रलोभनाला बळी न पडता सावधगिरी बाळगली. मात्र, काहीजण प्रलोभनाला बळी पडतात. भारतभर मोबाईलचे जाळे व्यापक बनल्याने कोणत्याही प्रांतातून फोन येतात. अधिकतर ते बँकेतून बोलतोय, एटीएम अपडेट करायच्या बहाण्याने गंडा घालतात, तर काही विमा पॉलिसीसाठी तुमची निवड झाली असून काही रक्कम भरणा करा, असे सांगतात. तुम्ही लाखो डॉलर्सचे बक्षीस जिंकला आहात, दिलेल्या खात्यात पैसे भरा मग तुमचे बक्षीस अदा केली जाईल, अशा बनावट मेल्स आणि कॉल्सच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारच्या कॉल्सला प्रतिसाद देणाऱ्या अनेकांची फसवणूक झाल्यामुळे त्यांच्यावर मन:स्ताप सहन करण्याची वेळ येत आहे. मालवणात दोन दिवसांपूर्वी एका युवकाला कर्जाचे आमिष दाखवून दोन लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. (प्रतिनिधी)पोलिसांकडून जागरूकता पण...बनावट कॉल्स तसेच फसवणुकीबाबत पोलिस प्रशासनाकडून दखल घेण्यात येत आहे. ठिकठिकाणी फसवणुकीचा धंदा करणाऱ्यांबाबत जनजागृती फलक लावण्यात येत आहेत.मात्र, एखादा नागरिक बनावट कॉल्सच्या प्रलोभनास बळी पडला तर त्याला न्याय मिळत नाही. बनावट कॉल्स करणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यास पोलिस अयशस्वी ठरले आहेत. ४फसवणूक करणाऱ्या संबंधितांना गजाआड करण्यासाठी सायबर क्राईमअंतर्गत उपाययोजना होणे गरजेचे आहे. गरजू पडतात बळीगेल्या काही वर्षांत बनावट कॉल्सला अनेकजण बळी पडले असून, यातील अनेकांना पैशाची गरज असते. त्यांच्या दुर्दैवाने अशाच वेळी एखादा कॉल आल्यास ते आपली वस्तुस्थिती सांगून बँक नंबर, पिन नंबर देऊन मोकळे होतात. काहीवेळा तर उसने पैसे घेऊन संबंधिताच्या खात्यात जमा करावे लागतात. अशा घटना घडत असताना हे प्रकार मात्र थांबत नाहीत. बनावट कॉलच्या भूलभुलैयाला अधिकारी वर्गही भुलला असून 'कंगाल' होण्याची नामुष्की ओढवल्याच्या घटना घडल्या आहेत. बनावट कॉल्सद्वारे आर्थिक फसवणुकीचा धंदा काही भामट्यांनी सुरू केला असून, याबाबत पोलिसांत तक्रारी येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.'त्यांची' अशीही दहशतसुज्ञ नागरिकाने बनावट कॉल्सधारकांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला तर ते उलटपक्षी धमकी देताना शिवीगाळ करून कॉल्स कट करतात. त्यानंतर त्याच नंबरवर कॉल करून त्यांना पोलिसात तक्रार दिली आहे, असे सांगितल्यावर आमच्या नावाची तुम्ही बदनामी केली आहात. तुमच्याच विरोधात तक्रार दिली असून तुम्हालाच पोलिस पकडतील. शिवाय शिवीगाळ करूनही फोन कट करण्याचे प्रतापही केले जातात.