शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

निलंबनाचा आदेश बदलला

By admin | Published: February 22, 2016 12:15 AM

अधिकाऱ्यांचे ‘लॉबिंग’ कार्यरत : वनक्षेत्रपाल पाटील यांच्या सक्तीच्या रजेत रुपांतर

सावंतवाडी : कणकवली वनपरिक्षेत्रात मालकीक्षेत्रात अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले कणकवली वनक्षेत्रपाल आर. एस. पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कुडाळ वनक्षेत्रपाल संजय कदम यांना कणकवली येथे प्रभारी म्हणून सोयीस्कररित्या जाता यावे, यासाठी हा आदेश बदलून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आदेश बदलण्यामागे एका निवृत्त अधिकाऱ्यासह सिंधुदुर्गपासून नागपूरपर्यंतची अधिकाऱ्यांची ‘लॉबिंग’ कार्यरत असल्याची चर्चा वनविभागातच सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या कणकवली वनपरिक्षेत्रातील वैभववाडी येथील लोरे नं.२, वाभवे, मांगवली व घोणसरी या चार गावात वनक्षेत्रपाल आर. एस. पाटील यांनी मागील तारखा दाखवून १५ खोटी मालकीप्रकरणे केली होती. या प्रकरणाचा ठपका ठेवून कृष्णा सावंत (वनपाल वैभववाडी) व दत्तगुरू पिळणकर (वनरक्षक घोणसरी) या दोघा वनकर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तर वनक्षेत्रपाल पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव नागपूर वनपरिक्षेत्राकडे पाठवून देण्यात आला होता. आतापर्यंत आर. एस. पाटील यांची कारकीर्द वादग्रस्तच ठरल्याने त्यांना सेवेतूनच बडतर्फ केले जावे, अशा प्रकारची चर्चा नागपूर येथील अधिकाऱ्यांमध्ये झाली होती. ही चर्चा सुरू असतानाच तात्पुरती त्यांची कणकवली येथून सामाजिक वनीकरण विभागात बदली करण्यात येणार होती. तसे आदेश नागपूर येथील कार्यालयाने निर्गमित केले होते. हे आदेश नागपूरहून कोल्हापूर येथे येण्यापूर्वीच काही निवृत्त अधिकाऱ्यांच्या साखळीने जर कणकवली वनक्षेत्रपाल निलंबित किंवा त्याची अन्यत्र बदली केली, तर त्याच्या जागी नवीन अधिकारी कोणतरी येईल आणि आम्ही ज्याच्यासाठी हे सर्व काही केले, ते फुकट जाईल म्हणून सिंधुदुर्गमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाटील यांचे निलंबन किंवा बदली करण्यापेक्षा सक्तीच्या रजेवर पाठवण्याबाबत एकमत झाले आणि तसा आदेशही काढण्यात आला हा आदेश बदलण्यामागे कुडाळ वनक्षेत्रपाल कदम यांनी वनविभागात मोठे लॉबिंग केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मुळचे देवगड-शिरगाव येथील असलेले कदम हे कुडाळ वनक्षेत्रपाल म्हणून गेली तीन वर्षे कार्यरत आहेत. त्यांची यावर्षी बदली होणार असून, जिल्ह्यातून बाहेर जाण्यापेक्षा याच जिल्ह्यात उर्वरित सेवा पूर्ण करण्याच्या हेतूने त्यांनी ही लॉबिंग केल्याची चर्चा आहे. यात काही अधिकाऱ्यांचा व राजकीय पुढाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनीही कदम यांच्यासाठी आपले वजन वरिष्ठ पातळीवर वापरले आहे. हा आदेश दोन दिवसंपूर्वीच नागपूर येथून कोल्हापूर येथे आला होता. तर गुरूवारी १८ फेबु्रवारीला हा आदेश सिंधुदुर्ग वनविभागाला पाठवण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी शुक्रवारी १९ फेबु्रवारी शिवजयंती असल्याने शनिवारी करण्यात आली. मात्र, हा आदेश देत असतानाच कोल्हापूर येथील मुख्यवनसंरक्षक एम. के. राव यांनी कणकवली येथील वनक्षेत्रपाल पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर त्यांच्या जागी कडावल येथील वनक्षेपाल रमेश कांबळे यांना पाठवा, असे आदेश दिले होते. मात्र, सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी मुख्यवनसंरक्षक राव यांना दूरध्वनीवरून चर्चा केली की, कडावल वनक्षेत्रपाल कांबळे हे कणकवली विभाग सांभाळण्यास राजी नाहीत. त्यामुळे हा कार्यभार कुडाळ यांच्याकडे दिला जावा, असे सांगितले. त्यामुळे लागलीच हा आदेश बदलण्यात आला. त्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणीही करण्यात आली.