शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

स्कुबा डायव्हिंग सेंटरचे ग्रहण सुटेना

By admin | Published: September 17, 2015 10:02 PM

तारकर्ली, देवबाग गावांमधील वाद : जिल्हाधिकाऱ्यांची सभा निर्णयाविना

मालवण : तारकर्ली-देवबाग अशा नामफलक वादात अडकून पडलेल्या स्कुबा डायव्हिंग सेंटरबद्दल निर्माण झालेला दोन गावांचा वाद निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी मंगळवारी आयोजित केलेली खास सभा निर्णयाविना आटोपती घेण्यात आली. यामुळे स्कुबा डायव्हिंग सेंटर प्रकल्पाचे ग्रहण सुटता सुटत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात ही सभा घेण्यात आली होती. यावेळी तहसीलदार वनिता पाटील, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले, दोन्ही गावांचे सरपंच, पोलीसपाटील तसेच इतर पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी देवबाग आणि तारकर्ली गावातील दोन्हींकडून नामफलक वादावर आपली भूमिका कायम ठेवण्यात आली होती. तारकर्लीकडून देवबागचे नाव नामफलकावर येऊ नये, तर देवबागकडून तारकर्ली-देवबाग किंवा देवबाग-तारकर्ली, असे कोणतेही नाव आम्हाला चालेल अशी भूमिका घेतली होती. तर एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी देतील तो निर्णय मान्य, अशी भूमिका मांडण्यात आली. मात्र, कोणताही निर्णय सभेत झाला नाही. (प्रतिनिधी)फलक नामकरणावरून वादस्कुबा डायव्हिंग सेंटर दोन्ही गावांच्या सीमेवरच आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये प्रवेशद्वारानजीकच्या फलकावर स्कुबा डायव्हिंग सेंटर देवबाग- तारकर्ली, असे नामकरण करण्यात आले. देवबागचे नाव लावण्यास तारकर्लीच्या ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. नंतर पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देवबागचे नाव काढून टाकले. त्यामुळे देवबागमधील पर्यटन व्यावसायिक आक्रमक झाले. पर्यटन महामंडळाकडून देवबाग गावाचे नाव रितसर दिले गेले असेल, तर स्थानिक अधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून ते हटवू नये. आम्ही ते कदापि सहन करणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. देवबाग ग्रामस्थांनी तारकर्ली, असा उल्लेख असलेली नावाची पट्टी काढून टाकली होती. यानंतर या वादावर तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात यश न आल्याने आजपर्यंत हा प्रकल्प रखडला आहे.वादात प्रकल्पाची वाताहात ?या सेंटरमध्ये देश-विदेशातील युवकांना स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार होते. प्रकल्प आॅक्टोबर २०१४ मध्ये पूर्ण होऊनही अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या सेंटरमध्ये आवश्यक कर्मचारी वर्गही भरलेला आहे. उद्घाटनच होत नसल्याने यात कोणत्याही प्रशिक्षणास अद्याप सुरुवात झालेले नाही. त्यामुळे शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले स्कुबा डायव्हिंग सेंटर शोभेची वस्तू बनले आहे. हे केंद्र सुरू झाल्यास देश-विदेशातून मोठ्या संख्येने युवक प्रशिक्षणासाठी देवबाग-तारकर्लीत आले असते. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनाच याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. करमणूक कर होणार लागूदरम्यान, जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दुपारी स्कुबा डायव्हिंग, स्नॉकलिंग तसेच इतर पर्यटन व्यवसायातील व्यावसायिकांना करमणूक कर भरावाच लागणार, असे स्पष्ट केले आहे. प्रशासनाने मेरीटाईम बोर्डाकडून आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून परवाने घेण्याची सूचना करण्यात आली.