शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

स्वाभिमान, शिवसेनेच्या नेत्यांनी नाणारबद्दल फेरविचार करावा : प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 1:15 PM

नाणार प्रकल्पाबाबत संबधित चौदा गावातील आठ हजार एकर जमिनीच्या मालकांनी प्रकल्पासाठी जागा देण्याचे कबूल करीत आपले समर्थन नोटरी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. संबंधित जमिन मालकांनी नाणार प्रकल्प समर्थक समितीची स्थापना केली आहे. तसेच ज्या गावांमध्ये विरोध आहे ती गावे वगळून अन्य गावांमध्ये प्रकल्प करण्यात यावा़ अशी मागणीही त्या जमिन मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व स्वाभिमान पक्षप्रमुख नारायण राणे यांनी नाणार बद्दल फेरविचार करावा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले.

ठळक मुद्देस्वाभिमान, शिवसेनेच्या नेत्यांनी नाणारबद्दल फेरविचार करावा :  प्रमोद जठार यांचे आवाहनविरोध आहे ती गावे वगळून अन्य गावांमध्ये प्रकल्प करण्यात यावा़

कणकवली : नाणार प्रकल्पाबाबत संबधित चौदा गावातील आठ हजार एकर जमिनीच्या मालकांनी प्रकल्पासाठी जागा देण्याचे कबूल करीत आपले समर्थन नोटरी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. संबंधित जमिन मालकांनी नाणार प्रकल्प समर्थक समितीची स्थापना केली आहे. तसेच ज्या गावांमध्ये विरोध आहे ती गावे वगळून अन्य गावांमध्ये प्रकल्प करण्यात यावा़ अशी मागणीही त्या जमिन मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व स्वाभिमान पक्षप्रमुख नारायण राणे यांनी नाणार बद्दल फेरविचार करावा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले.कणकवली येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जि़ल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, सरचिटणीस रविंद्र शेटये, चंद्रकांत हरयाण, बाबा कोकाटे, अरविंद कुडतरकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.प्रमोद जठार पुढे म्हणाले, नाणार रिफायनरी हा कोकणात आर्थिक क्रांती घडविणारा मोठा प्रकल्प आहे. १३ हजार एकर जमिन या प्रकल्पासाठी आवश्यक असून त्यापैकी बाधीत गावांतील आठ हजार एकर जमीन असलेल्या शोतकऱ्यांनी प्रकल्पाला समर्थन दिले आहे. निवडणुकांमध्ये राजकीय लाभासाठी नाणारला विरोधाचे राजकारण झाले़ आहे. ज्या स्वाभिमानने गिर्येत प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने भुमिका बजावली. तेथील बुथवर केवळ ६० मते राणेंना मिळाली आहेत. त्यामुळे राजकीय लाभ किंवा श्रेयवादात न अडकता बेरोजगारांच्या पोटापाण्यासाठी हा प्रकल्प होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत.दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जनतेला प्रकल्प हवा असल्यास आमचा विरोध नाही, अशी भूमिका अनेकदा घेतली होती. त्यामुळे नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी हा प्रकल्प होण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घ्यावी .मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प रोहा येथे स्थलांतरीत करण्याची घोषणा जरी केली असली तरी अजुनही वेळ गेलेली नाही. शेतकऱ्यांचे जर समर्थन असेल तर राजकीय मतभेद विसरून कोकणातील पुढील पिढीसाठी आपण सर्व पक्षीयांनी एकत्र येण्याची गरज आहे़. रोहा येथे प्रकल्प होत असेल तर त्या ठिकाणी प्रदुषण होणार नाही का? त्या ठिकाणी राष्ट्रवादीसह शिवसेनेचे समर्थन मिळाले आहे़. केवळ शेकापचा विरोध दिसत आहे़ . तर दुसरीकडे स्वाभिमान पक्ष तिथपर्यंत अद्यापही पोहोचला नाही, असा टोला प्रमोद जठार यांनी यावेळी लगावला.प्रमोद जठार पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, देवगड, तळेरे या चारही बसस्थानकांच्या प्रश्नी प्रभारी विभाग नियंत्रक रमेश कांबळे यांची मी भेट घेतली. वैभववाडी बसस्थानकाचा प्रश्न २२५ स्क्वेअरमिटर जागेच्या वादात अडकला आहे़ . हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने माझा पाठपुरावा राहिला आहे़. या बसस्थानकाबरोबरच कणकवली, तळेरे, आणि देवगड या तिनही बसस्थानकांच्या नुतणीकरणाचा प्रस्ताव घेऊन येत्या आठ दिवसात मंत्रालयात संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन अद्ययावत बसस्थानक तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्ग