शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

स्वतंत्र कोकणचे प्रणेते प्रा. महेंद्र नाटेकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 5:10 PM

गोव्याप्रमाणे कोकणचीही सर्वांगिण प्रगती व्हावी यासाठी स्वतंत्र कोकण राज्‍य निर्मितीचा ध्यास घेतला होता. स्वतंत्र कोकण, सोनवडे घाटमार्गसह पेन्शनरला न्याय मिळावा यासाठीही ते सतत झटत राहिले.

कणकवली : स्वतंत्र कोकण संघटनेचे प्रणेते तसेच सोनवडे घाटमार्गासाठी गेली चाळीस वर्षे लढा देणारे प्रा. महेंद्र नाटेकर यांचे आज बुधवारी अल्‍पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोवा बांबुळी येथील रुग्णालयात त्‍यांच्यावर उपचार सुरू होते. उद्या (गुरुवारी) त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.महेंद्र नाटेकर सर यांनी गेली वीस वर्षे पेन्शनर संघटनेसाठीही धडाडीने कार्य केले होते. सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांतही त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. त्‍यांच्या निधनाबद्दल सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्‍त होत आहे.प्रा. नाटेकर यांनी शिक्षण पूर्ण झाल्‍यांनतर मुंबई, पुणे येथे आलेल्‍या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या डावलून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभवडे (ता.कुडाळ) येथील दुर्गम गावामध्ये कनिष्‍ठ महाविद्यालयात अध्यापन सुरू केले होते. त्‍यानंतर त्‍याच कॉलेजमध्ये ते प्राचार्य पदावरून निवृत्त झाले.या कालावधीत विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी परवड पाहून त्‍यांनी चाळीस वषापूर्वी सोनवडे घाटमार्गासाठी लढा सुरू केला होता. स्थानिक ग्रामस्थांना एकत्र आणून त्‍यांनी तत्‍कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या काळात सोनवडे घाटमार्गाला मंजूरीही मिळवून आणली.सिंधुदुर्ग जिल्‍हा परिषदेमध्येही ते निवडून आले होते. मात्र त्‍यांनतर राजकारणात न जाता त्‍यांनी कोकणातील तरूणांना इथेच नोकऱ्या मिळाव्यात. गोव्याप्रमाणे कोकणचीही सर्वांगिण प्रगती व्हावी यासाठी स्वतंत्र कोकण राज्‍य निर्मितीचा ध्यास घेतला होता. पालघर ते सिंधुदुर्गपर्यंत त्‍यांनी झंझावाती दौरेही केले होते. अनेक नाटकेही त्‍यांनी लिहिली. स्वतंत्र कोकण, सोनवडे घाटमार्गसह पेन्शनरला न्याय मिळावा यासाठीही ते सतत झटत राहिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण