कुडाळ : मालवण तालुक्यातील वेरली गावातील विहिरीत पडलेल्या रानटी डुकरांची हत्या करणाºया समाजकंटकाना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा वाईल्ड लाइफ इमर्जन्सी सर्व्हिस या संघटनेच्यावतीने जिल्हा उपवनसंरक्षक तसेच अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.या निवेदनात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे अमली पदार्थांची तस्करी व आवक वाढली असून युवापिढीचा त्याकडे कल वाढत आहे. तर बालीश सर्पमित्रांचा गल्लोगल्ली सुकाळ होत असून त्यांच्याकडून स्टंटबाजी केली जात आहे. बिबट्याची कातडी, नख, अजगराची कातडी काही समाजविघातक लोकांकडे सापडून आली आहे. तसेच खवले मांजर व इतर संरक्षित प्राण्यांच्या शिकारीत वाढ होत आहे. अशा या प्रवृत्तीला वेळीच खीळ बसावी याकरिता आपल्याकडून अतिशय कठोर कारवाई संबंधितावर होण्याची गरज आहे.२५ नोव्हेंबर रोजी मालवण तालुक्यातील वेरली गावात विहिरीत पडलेल्या रानडुकरांची हत्या करणाऱ्या समाजकंटकांना कठोरात कठोर शिक्षा करून अशा प्रवृत्तीला आळा बसवावा अशीही मागणीही या निवेदनातून केली आहे. हे निवेदन वनविभागाच्या अप्पर जिल्हा अधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे संघटनेचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी दिले.
यावेळी उपाध्यक्ष आनंद बांबार्डेकर, सचिव तुषार विचारे आणि कमलेश चव्हाण, ओंकार लाड, वैभव आमरोसकर, सूरज मोर्जे, सोमनाथ वेंगुर्लेकर, विष्णू मसके, संजयकुमार कुपकर, चंद्रकांत मेस्त्री, प्रदीप बाणे, प्रभाकर पुजारे आदी प्राणीमित्र उपस्थित होते.सर्पमित्रांची यादी वन विभागाला देण्यात येणारजिल्ह्यातील वन्यजीवांच्या शिकारीस विरोध व्हावा, सर्व जैव स्रोतांचे आणि जैविक साधन संपत्तीचे संरक्षण व संवर्धन व्हावे या हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा वाईल्ड लाईफ इमर्जन्सी सर्व्हिस ही संघटना आम्ही स्थापन केली असून वनविभागाला सर्वतोपरी आमची संघटना सहकार्य करणार आहे. लवकरच सर्व प्राणी व सर्पमित्रांची यादीही वन