शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Published: March 28, 2016 11:03 PM

सदाशिव ओगले यांची मागणी : जिल्हा परिषद बांधकाम समिती सभा

सिंधुुदुर्गनगरी : देवगड तालुक्यातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गुरांचे गोठे बांधण्यासाठीचे शेतकऱ्यांमार्फत ३00 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र, त्यापैकी केवळ तीनच गोठ्यांना देवगड गटविकास अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. प्रस्ताव परिपूर्ण असतानाही जाणूनबुजून गटविकास अधिकारी प्रस्ताव मंजुरीसाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप सदस्य सदाशिव ओगले यांनी करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती दिलीप रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी सदस्य संदेश सावंत, सदाशिव ओगले, रूक्मिणी कांदळगावकर, दिपलक्ष्मी पडते, समिती सचिव तथा बांधकामचे कार्यकारी अभियंता सुनील साळोखे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सभेत आढावा घेण्यात आला. सन २0१५-१६ मध्ये जिल्ह्याला ९ कोटी ५५ लाख, ४५ हजाराचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. त्याची पूर्तता करताना १0 कोटी ४२ लाख रूपयांचे काम या योजनेअंतर्गत झाले आहे. २ लाख ९८ हजार मनुष्य दिनाच्या अनुषंगाने २ लाख ९४ हजार मनुष्य दिन भरलेले आहेत, अशी माहिती सभागृहात देत असतानाच सदाशिव ओगले यांनी गुरांच्या गोठ्या संदर्भातील माहिती मागविली. यावेळी देवगड तालुक्यात ३00 गोठ्यांचे प्रस्ताव आले असून यापैकी तीन कामांना मान्यता देण्यात आली आहे, असे सांगताच सदा ओगले आक्रमक झाले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत गोठ्यांच्या बांधकामाला मागणी असतानाही देवगड गटविकास अधिकारी हेतुपुरस्पर मान्यता देत नाहीत. अशा अधिकाऱ्यावर कारवाई होणे उचित असल्याचे त्यांनी सभागृहात सांगत तशी मागणी केली. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना या कामांचा तपशील घेऊन आपल्या दालनात उपस्थित राहण्याच्या सूचना सभापती दिलीप रावराणे यांनी दिल्या.बांधकाम समितीची आजच्या सभेवर मार्च एडिंगचा प्रभाव पदोपदी जाणवून येत होता. (प्रतिनिधी)शिक्षण विभागाचे २ कोटी मागे जाणार?शिक्षण विभागाला शाळांच्या दुरूस्तीसाठी सन २0१४-१५ मध्ये २ कोटी १२ लाख रूपये मंजूर झाले होते. हा निधी मार्च २0१६ पर्यंत खर्च करणे गरजेचे असतानादेखील अद्यापपर्यंत हा निधी अखर्चित राहिला असल्याचे सभागृहात उघड झाले. यावेळी सदस्य संदेश सावंत यांनी शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांना धारेवर धरत हा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च कसा होणार असा सवाल केला. यावर धाकोरकर म्हणाले, जास्तीत जास्त कामे ही तीन लाखाच्या आतील असल्याने निविदा प्रक्रिया मागवून पैसे खर्ची पाडू असे सांगितले. तर बांधकामचे कार्यकारी अभियंता साळोखे म्हणाले, या प्राप्त २ कोटी, १२ लाखांपैकी जेमतेम ५0 टक्के निधी खर्च होणार आहे. उर्वरीत निधी मागे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाले आहे.जिल्ह्यात पाणीटंचाई लागली जाणवूजिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणीटंचाई निवारण्याचे ४९ प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ दोनच प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली, अशी माहिती या विभागाकडून देण्यात आली. पाणीटंचाईच्या कामांचे ४९ प्रस्ताव सादर झाल्याने जिल्ह्याला पाणीटंचाईची झळ बसायला सुरूवात झाली आहे.सुनील साळोखे यांचे केले कौतुकबांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील साळोखे हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केले. आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांप्रमाणे इतरांनी काम करावे. याबद्दल संदेश सावंत, सदाशिव ओगले यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. सभापती दिलीप रावराणे यांनी त्यांचा सत्कार केला.