शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

‘लाईफ लाईन एक्स्प्रेस’चा लाभ घ्या

By admin | Published: April 16, 2017 10:55 PM

उदय चौधरी; सुरेश प्रभूंच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रारंभ

ओरोस : लाईफ लाईन एक्स्प्रेसमध्ये २० विशेष तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे. स्तनाच्या व तोंडाच्या कॅन्सरचे पूर्व निदान, दंतोपचार, कानाचे आजार, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, डोळे तपासणी अशाप्रकारच्या आरोग्य तपासण्या व शस्त्रक्रिया या लाईफ लाईन एक्स्प्रेसमध्ये केल्या जाणार आहेत. या आरोग्य सुविधांचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्थानकावर आयोजित लाईफ लाईन एक्स्प्रेसच्या उद्घाटनप्रसंगी केले.केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्गनगरी, विशाखापट्टण, भुवनेश्वर या तीन ठिकाणच्या लाईफ लाईन एक्स्प्रेस सुविधेचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्थानकावर आयोजित कार्यक्रमास माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर, अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, विजय केनवडेकर, आदी उपस्थित होते.केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सहकार्याने सिंधुदुर्गात प्रथमच लाईफ लाईन एक्स्प्रेसचे आगमन होत आहे. जिल्ह्यातील गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. याबाबत त्यांचे आभार मानून जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, सिंधुदुर्गात विशेषत: स्त्री रोगांच्या (ब्रेस्ट कॅन्सर किंवा मुख कॅन्सर) पूर्व तपासणीची सोय नाही; पण या लाईफ लाईन एक्स्प्रेसमुळे ही सुविधा मोफत उपलब्ध झाली. याचा लाभ विशेषत: महिलांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह म्हणाले की, या लाईफ लाईन एक्स्प्रेस सुविधेचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला व्हावा यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील इच्छुक रुग्णांना या ठिकाणी आणण्याची व्यवस्था केली आहे. ब्रेस्ट कॅन्सर किंवा मुख कॅन्सर पूर्व निदानासाठी आवश्यक असलेले मॅनोग्राफी हे यंत्र या एक्स्प्रेसमध्ये उपलब्ध आहे. याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त इच्छुक रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. लाईफ लाईन एक्स्प्रेसद्वारे तीन दिवसांची ही आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया मोहीम यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आश्रमातील रुग्णांची तपासणी करण्याची सूचनाजिल्हावासीयांच्या आरोग्य सेवेसाठी लाईफ लाईन एक्स्प्रेस जिल्ह्यात दाखल झाली असून, या चालत्या-फिरत्या हॉस्पिटलचा अनेक रुग्ण लाभ घेत आहेत. यावेळी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्यालयाच्या शेजारीच असलेल्या अणाव गावातील आनंदाश्रम व संविताश्रम या आश्रमांमधील रुग्णांकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता संबंधित आश्रमातील सर्व रुग्णांची तपासणी करण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना देतानाच या रुग्णांना ने-आण करण्यासाठी मोफत रुग्णवाहिका देण्याचे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी दिले.