शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग सहा तासांनी सुरळीत;पोलीस व बांधकामचे अथक प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 10:47 PM

चक्रिवादळामुळे झाडे कोसळून ठप्प झालेला तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल सहा तासानंतर सुरळीत झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा व पोलीसांनी

वैभववाडी(सिंधुदुर्ग): चक्रिवादळामुळे झाडे कोसळून ठप्प झालेला तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल सहा तासानंतर सुरळीत झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा व पोलीसांनी अथक परिश्रम घेत नाधवडे पिंपळवाडी येथे कोसळलेला जुनाट वटवृक्ष हटवून रात्री वाजता वाहतूक सुरु केली.वादळी पावसामुळे मंगळवारी वैभववाडी तालुक्यात दाणादाण उडाली. तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर नाधवडे ते कोकिसरे दरम्यान ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने सायंकाळी चारपासून मार्ग पुर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे काही वाहने अडकून पडली होती. तर या मार्गाची वाहतूक वैभववाडी फोंडामार्गे वळविण्यात आली होती. मात्र, वीजवाहीन्या व खांब तुटल्यामुळे कोकिसरे नाधवडे नापणे, कुसूर ही गावे अंधारात आहेत.

कोकिसरे नारकरवाडीपासून नाधवडेपर्यंत रस्त्यावर कोसळलेली झाडे हटविण्यास  पाचच्या सुमारास पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली होती. रेल्वे फाटकाच्या पुढे नाधवडेपर्यंत मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळल्याने दोन जेसीबी कार्यान्वित करण्यात आले होते. नाधवडे पिंपळवाडी येथे कोसळलेला जुनाट वटवृक्ष हटवून रात्री दहा वाजता तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यामुळे या महामार्गावरील वाहन चालक व प्रवाशांनी पोलीस तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अथक परिश्रमाचे कौतुक केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग