वैभववाडी : कोल्हापूरहून देवगडकडे निघालेल्या टेम्पोला करूळ घाटात दिंडवणेनजीक अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्याने हा टेम्पो वळणावर उलटून आतील काच सामानाचे मोठे नुकसान झाले. मात्र, या अपघातातून चालक सुदैवाने बचावला आहे.चालक प्रमोद मुदगल (रा. कोल्हापूर) स्लाईडिंग ग्लास भरलेली चारचाकी (एम.एच.०९; ईएम-४३०५) घेऊन कोल्हापूरहून देवगडकडे निघाला होता. करूळ घाटाच्या पायथ्यानजीक ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो वळणावर विरुद्ध बाजूला जाऊन उलटला. त्यामुळे सुदैवानेच चालक बचावला.टेम्पोतील संपूर्ण काच साहित्याचा चक्काचूर झाल्याने मोठे नुकसान झाले. टेम्पाचे ब्रेक घाट पायथ्यानजीक निकामी झाल्यामुळे भीषण दुर्घटना टळली आहे. या अपघाताची सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांत नोंद झाली नव्हती.
करूळ घाटात टेम्पोला अपघात, चालक सुदैवाने बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 3:21 PM
कोल्हापूरहून देवगडकडे निघालेल्या टेम्पोला करूळ घाटात दिंडवणेनजीक अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्याने हा टेम्पो वळणावर उलटून आतील काच सामानाचे मोठे नुकसान झाले. मात्र, या अपघातातून चालक सुदैवाने बचावला आहे.
ठळक मुद्देकरूळ घाटात टेम्पोला अपघातचालक सुदैवाने बचावला