शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

तेरेखोल नदी बनतेय मृत्यूचा सापळा

By admin | Published: April 27, 2015 9:40 PM

शासन अनभिज्ञ : असुरक्षिततेमुळे मार्गदर्शन फलक, सुरक्षा रक्षक आवश्यक

महेश चव्हाण - ओटवणे नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या आणि ओटवणे पंचक्रोशीतील जनतेची जीवनतारिणी असलेल्या तेरेखोल नदीची ओळख अलीकडच्या काळात ‘मृत्यूचा सापळा’ अशी बनू पाहत आहे. पर्यटनवाढीबरोबर येथील असुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. यासाठी शासनाने सूचना फलकांसह मार्गदर्शक, सुरक्षारक्षक आणि गावासाठी आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बारमाही संथ गतीने वाहणारी आणि जनतेची तहान भागवणारी तेरेखोल (गडनदी) नदी सध्या दुर्दैवी प्रकारांनी ग्रासली आहे. बावळाट येथील घटनेने नदीच्या सौंदर्य, पर्यटनाला धक्का पोहोचला आहे. बावळाट येथील ‘कुत्र्यांची कोंड’ याठिकाणी बेळगावहून फिरायला आलेल्या कागाझो दाम्पत्याचा आठ दिवसांपूर्वी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.दगडावरून घसरून पडल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने या दाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेने पर्यटनावर याचा मोठा परिणाम होणार आहे. एका बाजूला १०० टक्के पर्यटनासाठी प्रयत्न करणारे शासन मात्र या घटनेनंतर मूग गिळून गप्प आहे. ओटवणे पंचक्रोशीतून बावळाट, सातोळी, सरमळे, दाभील, ओटवणे, विलवडे, वाफोली, बांदा अशी पुढे सरसावणारी तेरेखोल नदी असंख्य लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली आहे. ओटवणे, विलवडे, बावळाट या नदीपात्राच्या भागात तर याचे प्रमाण अधिक आहे. ओटवणे-सरमळे पुलानजीक भगात, पानवळ, सरमळे बावळाट क ोंड येथे अनेकजण मृत्यूच्या दाढेत ओढले गेले आहेत. गत पाच वर्षांचा विचार केल्यास वीसपेक्षा अधिक लोक बुडून मृत्युमुखी पडले आहेत. पर्यटनाचा कांगावा करणारे शासन मात्र यापासून अनभिज्ञ आहे. सावधानतेचे फलक लावणे गरजेचे ओटवणे पंचक्रोशीतून वाहणारी तेरेखोल नदी केवळ बारमाही वाहणारा जलप्रवाह नाही, तर सौंदर्याचा असुरक्षित अनमोल ठेवा आहे. माडभर खोली असलेल्या क ोंडी, रांजणखळगे, कुंभगर्ते आणि नैसर्गिक भोवरे या नदीपात्रात पहायला मिळतात. नैसर्गिक तसेच धार्मिक अधिवासात असलेल्या या नदीपात्राच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावले येथे आपसूकच वळतात. मात्र, येथील परिसराची माहिती आणि पाण्याची खोली याबाबत माहिती नसल्याने काही जणांचा नाहक बळी जातो. यासाठी शासनस्तरावरून याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील असुरक्षित पर्यटनस्थळांची माहिती देणारे फलक लावणे आवश्यक आहे. फलकांमध्ये सर्वोच्च खोली, रांजणखळगे, कुंभगर्ते, भोवरे, धोकादायक जलचर आदी बाबींचा स्पष्ट उल्लेख करावा. जेणेकरून पर्यटक अतिउत्साह न दाखविता सुरक्षितपणे पर्यटनाचा आस्वाद घेतील. पर्यटनवाढीबरोबर येथील असुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने यासाठी फलकांसह मार्गदर्शक, सुरक्षारक्षक आणि गावासाठी आणि गावासाठी आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास अशा दुर्दैवी घटना टाळता येणे शक्य आहे. मगरी, देवमासे यांचा वावर तेरेखोल नदीपात्रात मोठमोठ्या देवमाशांसह आठ-दहा फू ट लांबीच्या धोकादायक मगरींचाही वावर आहे. मगरींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पर्यटकांसह स्थानिकांनासाठीही हा धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे अशा प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी आंघोळ अथवा कपडे धुण्यासाठी उतरू नये, असे मार्गदर्शक फलक येथे लावणे अत्यंत गरजेचे आहे.