शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

तेरेखोल नदीला पूर ;बांदा बाजारपेठेत पुराचं पाणी घुसलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 11:26 AM

Rian Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने बांद्यातील तेरेखोल नदीला पूूूर आला. पुराचे पाणी बाजारपेठेत घुसले आहे. बांदा शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. काही दुकानात पाणी गेल्याने दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविले आहे.

ठळक मुद्देतेरेखोल नदीला पूर ;बांदा बाजारपेठेत पुराचं पाणी घुसलंकणकवली, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस

बांदा :सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने बांद्यातील तेरेखोल नदीला पूूूर आला. पुराचे पाणी बाजारपेठेत घुसले आहे. बांदा शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. काही दुकानात पाणी गेल्याने दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविले आहे.वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने वेंगुर्ले मार्गे बेळगाव मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाने बांदा शहर हे पूर प्रवण असल्याने सावंतवाडी तालुक्यासाठी जोखमीच्यावेळी एनडीआरएफचे पथक तैनात केले आहे.

या पथकाने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी शहरातील तेरेखोल नदी व पूर प्रवण क्षेत्राची पाहणी केली होती.आज पहाटेच पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले. दुपारपर्यंत याठिकाणी पूरस्थिती होती, मात्र प्रशासनाचे एनडीआरएफचे पथक याठिकाणी फिरकलेच नाही.कणकवली, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीच्या बाहेर वाहत असल्याने बांदा परिसरातील काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग