शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

ठाकरे यांचे राजकारणच सौदेबाजीवर!, नितेश राणेंची घणाघाती टीका 

By सुधीर राणे | Published: May 04, 2023 6:20 PM

संजय राऊतांचा पवार कुटुंबियांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न 

कणकवली: खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांचेही ब्लॅकमेलिंगचे धंदे आहेत. बारसू ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला समर्थनासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी जे पत्र दिले त्याची किंमत शंभर कोटी होती. आता विरोधासाठी किती घेणार? अडीचशे कोटी की  ५०० कोटी ते जाहीर करावे असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले.कणकवली येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी राणे म्हणाले, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बुधवारी बेळगाव येथे गेले होते. कर्नाटक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तिथे त्यांनी सभा घेतली. मोठया तावा-तावाने ते बोलत होते. मराठी बांधवांसाठी प्रचाराला गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मी पुन्हा पुन्हा सांगतो की, हिंमत असेल तर पत्राचाळीतील मराठी माणसांबद्दल त्यांनी बोलावे. त्यांना मराठी माणसांबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. संजय राऊत यांनी आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आग लावली. तर सामनात  आग्रलेख लिहून  पवार कुटुंबियांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न त्यांनी आता केला आहे.संजय राऊत यांचे  म्हणणे आहे की, बेळगाव आंदोलनाशी भाजपचा काही संबंध नाही. मात्र, त्यांनी एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्यावं की, बाळासाहेबांचं बेळगावसाठी आंदोलन सुरू होत तेव्हा ते कुठे होते ? पवार कुटुंबियांमध्ये आग लावण्याचे कामसुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये आग लावण्याचे काम आजच्या सामना मधील अग्रलेखामधून करण्यात आले आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांना मी विनंती करतो की, संजय राऊत यांना घरी घेऊ नका. ते घरी घेण्याच्या लायकीचे माणूस नाहीत. त्यांचा एक डोळा पवार कुटुंबावर आहे तर एक डोळा तेजस व आदित्य ठाकरेंवर आहे.  महाराष्ट्राच्या राजकारणात शकुनी मामा बनून ते फिरत असल्याची टीकाही नितेश राणे यांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतNitesh Raneनीतेश राणे