शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

..म्हणूनच नितेश राणेंचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांकडे दुर्लक्ष, सुशांत नाईकांचा आरोप

By सुधीर राणे | Published: July 03, 2023 4:54 PM

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागनाथ  धर्माधिकारी यांच्यावर राग काढणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी आधी स्वतःच्या मंत्रिपदाच्या ...

कणकवली: कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागनाथ  धर्माधिकारी यांच्यावर राग काढणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी आधी स्वतःच्या मंत्रिपदाच्या मागे फिरण्यापेक्षा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेसाठी अत्यावश्यक असणारी साधनसामुग्री आणि रिक्त असलेली डॉक्टरची पदे भरावीत. स्वतःच्या रुग्णालयामध्ये रुग्ण यावेत म्हणूनच राणे उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला आहे. रुग्णसेवेत नेमक्या कोणत्या समस्या आहेत याची माहिती शिवसेना उबाठाच्या शिष्टमंडळाने सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ धर्माधिकारी यांची भेट घेऊन सोमवारी घेतली. यावेळी माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी, वागदे माजी सरपंच रुपेश आमडोसकर, योगेश मुंज, सचिन आचरेकर, वैभव मालंडकर, तेजस राणे, सोहम वाळके, नितेश भोगले आदी उपस्थित होते.नाईक यांनी डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांना रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णावर येथेच पूर्ण उपचार व्हायला हवेत. गरज नसताना रुग्ण रेफर करू नकात अशी सूचना करतानाच हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी आवश्यक साधनांच्या कमतरतेबद्दल माहिती घेतली. यावेळी डॉ. धर्माधिकारी यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना श्वसनाचा त्रास झाल्यास लागणारा निओनेटल व्हेंटिलेटर, वर्कस्टेशन ऍनस्थेशिया मशीन, हाडांच्या ऑपरेशनसाठी आवश्यक सीआर्म मशीन, एक्सरे लेझर प्रिंटर, लेप्रास्कोप मॉनिटरसह, ऑर्थोपेडीक ऑपरेशन साठी लागणारी सर्व इन्स्ट्रुमेंट आदी साधनसामुग्री नसल्याचे सांगितले.तसेच कायमस्वरूपी मंजूर असलेल्या १७ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी केवळ ३ पदे भरलेली असून स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ञ, फिजिशियन ही तातडीची आणि अत्यावश्यक पदे रिक्त आहेत. सध्या कंत्राटी डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयात असून त्यांच्याद्वारे रुग्णांवर उपचार सुरू असल्याचेही सांगितले. यावेळी सुशांत नाईक यांनी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून रिक्त पदे आणि अत्यावश्यक साधनसामुग्री उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली. तसेच माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी शहरातील खासगी डॉक्टर आणि उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची मिलीभगतच्या चर्चा सुरू असल्याचे सांगत हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा दिला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीhospitalहॉस्पिटलNitesh Raneनीतेश राणे