सावंतवाडी : बांद्याहून गणेश चतुर्थीचे घाऊक सामान घेऊन मालवण गोठणे कडे परतणाऱ्या कारचा पुढील टायर फुटून शनिवारी झाराप पत्रादेवी महामार्गावर नेमळे येथे अपघात झाला होता.या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले होते.तर चालक विशाल वसंत हाटले हा गंभीर जखमी झाला होता.त्याच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरू होते. मात्र रविवारी सकाळी त्याचाही मृत्यू झाला असून अपघातातील मृताची संख्या तीन झाली आहे.
मालवण तालुक्यातील गोठणे येथील लोचन सुरेश पालांडे( 45) संतोष भास्कर परब( 40) दीपक गोविंद आचरेकर (32) विशाल वसंत हाटले (40) हे चौघेजण बांदा येथे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर घाऊक खरेदीसाठी गेले होते तेथून खरेदी करून दुपारच्या सुमारास पुन्हा गोठणे कडे परतत असतना त्याची कार झाराप पत्रादेवी महामार्गावरील मळगाव नेमळेच्या जवळ आली असता कारचा पुढील टायर फुटून कार डिव्हायडर ओलांडून रस्त्याच्या पलीकडे तब्बल 300 ते 400 मीटर शेतात जाऊन उलटली.
या अपघातात संतोष परब व लोचन पालांडे हे जागीच ठार झाले होते तर कारचालक विशाल हाटले गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.त्यांच्यावर प्रथम सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते.मात्र त्याच्यावर उपचार सुरू असतनाच हाटले याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला.तर दीपक आचरेकर याला किरकोळ दुखापत झाल्याने ते सुखरूप आहे.पोलीसांनी त्याच्याकडून अपघाता बाबत खबर घेतली.
अपघाताची भीषणता पाहता हा अपघात वेगावर नियंत्रण रक्त आल्यानेच झाला असावा असा अंदाज उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर काढला तसेच गाडीचे स्पीड हे कमीत कमी 130 ते 140 प्रति किलोमीटर असावे असा अंदाजी त्यांनी सावंतवाडी पोलिसांकडे बोलून दाखवला. अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांनी सांगितले.परिसरातील ग्रामस्थांचे जाबजबाब तसेच तज्ञ लोकांकडून माहिती या सगळ्या नंतर अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.यात प्रथमदर्शनी दोषी असेल त्यावरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.