शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

कणकवलीतील उड्डाणपुलाला भालचंद्र महाराजांचे नाव

By सुधीर राणे | Published: January 29, 2024 12:16 PM

कणकवली: मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत कणकवली शहरातून गेलेल्या उड्डाणपुलाला अखेर परमहंस भालचंद्र महाराज उड्डाणपूल असे नाव देण्यात आले आहे. ...

कणकवली: मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत कणकवली शहरातून गेलेल्या उड्डाणपुलाला अखेर परमहंस भालचंद्र महाराज उड्डाणपूल असे नाव देण्यात आले आहे. परमहंस भालचंद्र महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सुरू असताना कणकवलीवासीयांकडून  सोमवारी पहाटेच्या सुमारास हे नामकरण करण्यात आले. कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये बाजारपेठकडे येणाऱ्या रस्त्याच्या दिशेने हा नामकरण फलक लावण्यात आला आहे.  या फलकावर परमहंस भालचंद्र महाराज यांच्यासह अप्पासाहेब पटवर्धन यांचे छायाचित्र व श्री स्वयंभू, रवळनाथ या ग्रामदेवतांचे नाव देखील आहे. कणकवली शहरातील महामार्ग उड्डाण पुलाला भालचंद्र महाराज यांच्या सोबतच अप्पासाहेब पटवर्धन यांचे नाव देण्याची ही मागणी काही वर्ष सुरू होती. अद्यापपर्यंत या उड्डाणपुलाला नाव देण्या बाबत केवळ चर्चा झालेल्या असताना प्रशासकीय पातळीवरून याबाबत कोणत्याही हालचाली होत नव्हत्या. दरम्यान, सोमवारी कणकवली शहरात पहाटे घडलेली ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. रविवारी रात्रीपासूनच याबाबतची कुजबूज कणकवली शहरात चालू होती. त्यानंतर सोमवारी सकाळी भालचंद्र महाराज यांच्या नावाने उड्डाणपूलाचे नामकरण करण्यात आले. त्यामुळे कणकवली शहरातील उड्डाणपूल आता यापुढे भालचंद्र महाराज उड्डाणपूल या नावाने ओळखले जाणार आहे.

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यापूर्वी अनेकदा स्थलांतरित करण्याबाबत चर्चा झाल्या होत्या. हा पुतळा देखील पहाटे चार वाजण्याच्या सुमारास स्थलांतरित करण्यात आला होता. गेली अनेक वर्ष सुरू असलेला हा प्रलंबित प्रश्न महायुतीच्या सत्ता स्थापनेनंतर चुटकीसरशी सुटला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कणकवली शहरात पहाटेच्या प्रहरी ही एक महत्त्वपूर्ण घटना घडल्याने कणकवलीच्या इतिहासात या पहाटेची पुन्हा एकदा वैशिष्ट्यपूर्ण अशी नोंद होणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग