शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

Sindhudurg News: फासकीत अडकलेल्या बिबट्याची केली सुटका, ग्रामस्थांची सतर्कता, अज्ञाताविरोधात गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 3:52 PM

फसकी लावणाऱ्या व्यक्तीचा वन विभाग शोध घेणार

आचरा : आचरा पारवाडी येथे शिकाऱ्याच्या फासकीत अडकलेल्या बिबट्याला स्थानिक ग्रामस्थ आणि वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने दीड तासांनी सुटका करत पिंजऱ्यात जेरबंद केले. ही घटना बुधवारी १० वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. बिबट्या मादी जातीचा असून दीड ते दोन वर्षाचा असल्याचे वनाधिकारी यांनी सांगितले.आचरा पुलानजीक असलेल्या पारवाडी येथे एका कुंपणात बुधवारी रात्री १० वाजण्याच्या संशयास्पद हालचाल होत असल्याचे दिसून आली. कुंपणाच्या दिशेने ग्रामस्थांनी लाईटचा प्रकाशझोत टाकला असता बिबटा फासकीत अडकल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी पत्रकार अर्जुन बापर्डेकर आणि आचरा पोलिस ठाण्याशी संपर्क साधत माहिती दिली. बापर्डेकर यांनी मालवणचे वनपाल श्रीकृष्ण परीट यांना माहिती दिली.वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच कुडाळहून रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल होत शिताफीने बिबट्याची सुटका केली. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनविभागचे सावंतवाडीचे सहायक वनसंरक्षक अमृत शिंदे, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, मालवण वनक्षेत्रपाल श्रीकृष्ण परीट, वनपाल धुळुप कोळेकर, वनपाल सावळा कांबळे, शरद कांबळे, कर्मचारी अनिल परब, राहुल मयेकर यांचा समावेश होता.फासकीत अडकलेल्या बिबटा बिथरला होता, त्यातच बघ्यांची गर्दी वाढू लागल्याने आचरा पोलिस ठाण्याचे हवालदार बबन पडवळ, अभिताज भाबल यांनी ग्रामस्थांना आवाहन करत गर्दीवर नियंत्रण मिळवले. शेवटी फासात अडकलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात ढकलत जेरबंद केले. या मोहिमेत उपस्थित असलेल्या पारवाडी ग्रामस्थांचेही मोलाचे सहकार्य वनविभागाला लाभले.वनविभागाकडून शोधकुंपणात शिकारी करण्याच्या उद्देशाने फास लावल्याप्रकरणी अज्ञातावर वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसकी लावणाऱ्या व्यक्तीचा वन विभागाकडून कसून शोध घेतला जाणार आहे. फासकीसह विहिरीमध्ये वन्यप्राणी आढळून आल्यास वनविभागाला माहिती द्या, असे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गleopardबिबट्याforest departmentवनविभाग