शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

Sindhudurg: तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड, गोव्याला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 17, 2024 7:16 PM

कुडासे धनगरवाडी येथील घटना : रस्त्याला नदीचे स्वरूप, भातशेतीही घुसले

वैभव साळकरदोडामार्ग : ताडपत्री घालून तात्पुरती डागडुजी केलेला तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याला शनिवारी भगदाड पडले. ही घटना कुडासे धनगरवाडी येथे घडली. कालव्याचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. तसेच ते भातशेतीतही घुसले. लागलीच या घटनेची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला.भगदाड पडलेल्या कालव्याच्या ठिकाणी एक मोरी आहे. कालव्यालगतच्या डोंगराळ भागातील पाणी या मोरीतून सखल भागात जाते. या कालव्याच्या बांधकामास जवळपास २५ ते ३० वर्षांचा कालावधी लोटला आहे. परिणामी ही मोरी खचली. मात्र याकडे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले व याचा विपरीत परिणाम शनिवारी सकाळी जाणवला आणि कालव्याला भगदाड पडण्याची दुर्दैवी घटना घडली.

गोव्याला जाणारे पाणी तीन आठवडे बंद राहणारपरिणामी गोव्याला होणारा पाणीपुरवठा सध्या बंद आहे. शिवाय सध्या पाऊस पडत असल्याने काम सुरू करण्यास अडचणी येणार आहेत. तरीही लवकरच काम सुरू केले जाईल असे कार्यकरी अभियंता विनायक जाधव यांनी सांगितले. शिवाय गोव्याला जाणारे हे पाणी दोन ते तीन आठवड्यांसाठी बंद राहणार असल्याचेही ते म्हणाले. फुटलेल्या कालव्याची पाहणी दोडामार्ग (गोवा) येथील जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अधिकारी आनंद पंचवाडकर यांनी केली. तसेच पाणी बंद झाल्यामुळे गोव्यावर पाणीटंचाईचे सावट आल्याचे ते म्हणाले.

अधिकाऱ्यांना धरले धारेवरकालव्याला भगदाड पडल्याची माहिती तेथील शेतकऱ्यांनी पत्रकारांना दिली. शिवाय संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनादेखील कळविले. ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान कालव्यातून पाणी प्रवाह बंद करण्यात आला. यावेळी त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दिवसा घटना घडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु जर हीच घटना रात्री घडली असती तर याला जबाबदार कोण ठरला असता, असा सवाल उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे यांनी विचारला. तसेच जलसंपदा विभाग हा सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाTilari damतिलारि धरण