कुडाळ : जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी, पत्नीला चांगले आरोग्य व दीर्घायुष्य मिळावे या करीता तसेच एकात्मिकता व समानतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने कुडाळ मधील पुरूषांनी आगळी वेगळी पुरुषांची वटपौर्णिमा याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली. विशेष म्हणजे गेली 12 वर्षे ही वटपौर्णिमा साजरी केली जात आहे.जन्मोजन्मी हाच पती लाभो, दीर्घायुष्य लाभो या करीता वटपोर्णिमा हा सण महीला मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. या वरून स्फूर्ती घेऊन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर व कुडाळ येथील प्रसिध्द स्त्री रोगतज्ञ डॉ. संजय निगुडकर व त्यांच्या सहकार्यांतर्फे 2010 पासून कुडाळ गवळदेव मंदिर येथे पुरुषांची वटपौर्णिमा साजरी येथे केली जाते.या वर्षीही श्री देव गवळदेव मंदिर येथे उमेश गाळवणकर, डॉ. संजय निगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. डॉ.सुरज शुक्ला , डॉ.व्यंकटेश भंडारी, प्रा.अरुण मर्गज,प्रा. परेश धावडे, प्रा.प्रथमेश हरमलकर, राजू कलिंगण, जांभळे, सुरेश वरक, पालव, प्रसाद कानडे, संतोष पडते, सुनील गोसावी, गजा टारपे विविध क्षेत्रातील पुरूषांनी मोठ्या उत्साहात वडाला सात फेर्या मारून ,वटपूजा करून पत्नीच्या निरोगी, दीर्घ आयुष्यासाठी परमेश्वराकडे मागणे मागून वटपौर्णिमा साजरी करीत आपल्या सुविद्य पत्नीची साथ, सहकार्य जन्मोजन्मी मिळावे अशा प्रकारचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हा उप्रकम स्त्री-पुरुष समानतेचे एक मूर्तिमंत प्रतीक आहे.समानता, एकात्मता ही भावना जोपासण्याचा प्रयत्नपतीचे आरोग्य चांगले राहो, दीर्घायुष्य लाभो या करीता महीला शेतीसाठी वटपोर्णिमा व्रत करतात. त्याच प्रमाणे पत्नीच्या चांगल्या आरोग्य व दीर्घायुष्या साठी आम्ही ही या ठिकाणी वटपोर्णिमा साजरी करीत असुन खर्या अर्थाने स्त्री पुरूष समानता, एकात्मता ही भावना जोपासत असल्याचे सांगितले.कृतज्ञता, प्रेम, आदर व्यक्त करण्याची संधीस्त्री रोगतज्ञ डाॅ. संजय निगुडकर यांनी सांगितले की, आम्हाला ही पत्नीने दिलेल्या योगदाना बद्दल कृतज्ञता, प्रेम, आदर व्यक्त करण्याची एक संधी उमेश गाळवणकर यांच्या संकल्पनेतून मिळाली व याला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असुन आता अनेक ठिकाणी अशा प्रकारे हा उपक्रम साजरा होत आहे.
समानता, एकात्मतेचा संदेश; कुडाळमध्ये पुरुषांनी साजरी केली आगळीवेगळी वटपौर्णिमा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 4:54 PM