शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

राजकीय हेतूने गैरसमज पसरवण्याचे काम, 'त्या' नोटिसींचा आणि पंतप्रधान, राष्ट्रपती दौऱ्याचा संबंध नाही - तोरसकर  

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 27, 2023 3:44 PM

मालवण : प्रशासनाने मालवण किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासंदर्भात संबंधित व्यावसायिक यांना नोटिसा बजावल्या आहेत या नोटिसा लोकशाही दिनात उपस्थित ...

मालवण : प्रशासनाने मालवण किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासंदर्भात संबंधित व्यावसायिक यांना नोटिसा बजावल्या आहेत या नोटिसा लोकशाही दिनात उपस्थित केलेल्या एका नागरिकाच्या तक्रारीच्या अनुषंगाने बजावण्यात आल्या आहेत. या नागरिकाने पर्यटन व्यावसायिक यांच्या अनधिकृत बांधकामामुळे आपल्या व्यवसायावर तसेच वहिवाटीवर बाधा येत आहे, तसेच अतिक्रमणावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने सबंधित व्यक्तींना नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालवण भेट याचा दुरान्वये सबंध नाही. काही राजकीय हेतूने प्रेरित माणसे व्यापारी, पर्यटन व्यावसायिक तसेच मच्छीमार यामध्ये गैरसमज पसरवून वातावरण बिघडविण्याचे काम करीत असल्याचे भाजप मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.विशेष म्हणजे यातील तक्रारदार नागरिक हा मविआ आघाडीचा पदाधिकारी आहे. पंतप्रधान व राष्ट्रपती यांचा नौदल दिनानिमित्त होणारा मालवण दौरा ऐतिहासिक असून मालवण तसेच सिंधुदुर्ग किल्ला जगाच्या नकाशावर येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोटमध्ये होणाऱ्या पुतळ्यामुळे पर्यटनाचे नवीन ठिकाण निर्माण होत आहे. त्याचा फायदा स्थानिक व्यापारी, पर्यटन व्यावसायिक तसेच मच्छीमार यांनाच होणार आहे. त्यामुळे मच्छीमार व पर्यटन व्यावसायिकांनी टोकाची भूमिका घेऊ नये तसेच कुठच्याही अफवेला बळी पडू नये. त्याचबरोबर तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन सोबत संबंधित विषयात चर्चा चालू आहे. लवकरच तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांची मच्छीमार तसेच पर्यटन व्यावसायिकांसोबत बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तरी, मच्छीमार व पर्यटन व्यावसायिकांनी आंदोलनात्मक पवित्रा न घेता प्रशासनाशी संवाद साधावा व त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत, असेही आवाहन या प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनारा