कुडाळ (सिंधुदुर्ग) : मुंबईगोवामहामार्गाचे सिंधुदुर्गातील काम ९५ टक्के पूर्ण झाले असून रस्ता पूर्णत्वाकडे जात आहे. तर रायगड, रत्नागिरीचे काम प्रगतीपथावर आहे. तरीही यातील अडचणी दूर करुन युध्दपातळीवर काम करु. या महामार्ग पूर्णत्वाची डेडलाईन २३ डिसेबर २०२३ ची असेल. पनवेल पासून बांद्यापर्यंत हा महामार्ग पूर्ण करून तो खुला होईल अशी हमी शनिवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, दत्ता सामंत, अतुल काळसेकर, ॲड. अजित गोगटे, प्रभाकर सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.मुंबईगोवा महार्गाच्या रखडलेले काम आपण गांर्भीयाने घेतले आहे. अधिवेशनात लक्षवेधी आल्यानंतर आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आज प्रत्यक्ष पहाणी केली आहे. महामार्गाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करुन ते काम दुसऱ्या यंत्रणेमार्फत पूर्ण करुन घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे असेल तर लोकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. महामार्गाचे रखडलेले काम असो किंवा जिल्ह्यातील घाट रस्तांचा प्रश्न असो सद्या भाजपचे गतीमान सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशाचे नेते आहेत. त्यांनी या महामार्गाला मंजूरी व निधी दिला आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विकासाची गती कशी असेल हे सर्वानाच दाखवून दिले आहे. त्यामुळे महामार्ग पुर्णत्वाकडे मेण्यासाठी जी डेडलाईन आता दिली आहे त्या काळातच हा महामार्ग पूर्ण होईल अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.रिफायनरी प्रकल्प पूर्ण होणारचनाणार येथील रिफायनरी प्रकल्प हा भारतीय जनता पक्षाने आणलेला प्रकल्प आहे तो पूर्ण होणारच आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी अनेक प्रश्नांसंदर्भात आज आपली भेट घेतली. या दौऱ्यात अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भेट घेतली. त्यात शिवसेनेचे कुडाळचे आमदार वैभव नाईक यांचाही समावेश होता. विकासकामांवर ही भेट असल्याचे स्पष्ट केले.
अर्धवट कामे तातडीने पूर्ण होतीलमुंबई गोवा महामार्गावर ५६ बेकायदेशीर मिडल कट असून यामुळे अनेक अपघात झाले आहे याबाबतही पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले महामार्गावरील वाहतूक सुकर व्हावी वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास कमी व्हावा या दृष्टीने ज्या अडचणी आहेत व जी कामे अर्धवट आहेत ती तातडीने पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही रवींद्र चव्हाण यांनी दिली.