शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

Sindhudurg News: सावंतवाडीकरांसमोर नवं संकट, अनेक विहिरींचे पाणी कमी होऊ लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 4:15 PM

नगरपालिका दुहेरी संकटात

सावंतवाडी : मोती तलावातील गाळ काढताना संरक्षक कठड्याला धोका पोचल्याने तो कठडा भरपावसात कोसळला त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले खरे; पण आता सावंतवाडीकरांसमोर वेगळेच संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे.अनेकांच्या मते ऐन जानेवारीच्या तोंडावर तलावातील पाणी सोडून देण्यात आल्याने तलावाच्या आजूबाजूच्या परिसरातील विहिरी आटण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून काही विहिरीचे पाणी ही कमी होऊ लागले आहे.सावंतवाडी मोती तलावातील गाळ गेल्या वर्षी काढण्यात आला  हा गाळ काढत असताना गाळ काढण्यासाठी आणलेल्या पोकलॅड मशीन तलावाच्या फुटपाथवर ठेवण्यात आले होते. त्यावेळी या फुटपाथला धोका निर्माण झाला आणि ऐन पावसाळ्यात हा फुटपाथ तसेच संरक्षक कठडा कोसळला असून जुन्या मुंबई गोवा महामार्गाला ही धोका पोचला आहे. हा धोका वाढत जाणार असे वाटत असल्याने या फुटपाथ तसेच संरक्षक कठड्याचे काम तातडीने व्हावे म्हणून अनेकांनी आंदोलने केली  होतीया आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या साठी प्रयत्न करत 1 कोटी 12 लाख रूपयांचा निधी ही मंजूर करण्यात आला आहे. तसेच त्याचे भूमिपूजन ही अलिकडेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडले.त्यामुळे या कामाची सुरुवात होणार हे आता निश्चित झाले आहे.त्यासाठी तलावातील पाणी ही सोडून देण्यात आले आहे. कारण पाणी सोडले नाही तर कामही करता येणार अशा दुहेरी संकटात नगरपालिका आहे.शहरातील विहिरींना धोकापाणी सोडून देण्यात आल्याने सावंतवाडीकरांसमोर संकट उभे राहण्याची शक्यता नाकारता ही येत नाही कारण जानेवारीच्या सुरुवातीलाच पाणी सोडल्याने अनेक विहिरींचे पाणी आटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तलावातील पाणी हे मे च्या अखेरपर्यंत कमी होत असते त्यावेळी शहरातील अनेक विहिरी या कोरड्या पडतात मात्र आता जानेवारीच्या सुरुवातीलाच पाणी सोडून देण्यात आल्याने शहरातील विहिरीना धोका निर्माण झाला आहे.प्रशासनावर आला दबाव यामुळे शहरात पाणी टंचाई भासण्याची शक्यता जास्त आहे.काहि च्या मते हे काम मे महिन्यात सुरू करणे संयुक्तिक होते.शहर वासियाच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता आणि काम ही झाले असते पण सर्वपक्षीयाची आंदोलने आणि प्रशासनावर असलेला दबाव यामुळे काम घाईगडबडीत सुरू केले असले तरी ते लवकरात लवकर संपवले नाही.सावंतवाडीवासियाच्या उग्र प्रतिकिया येण्यास वेळ लागणार नाही

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणी