शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

कोकण कृषी विद्यापीठाचे काम उल्लेखनीय, नवनिर्वाचित कुलगुरु संजय भावे यांचे प्रतिपादन

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 23, 2023 3:38 PM

राष्ट्रीय स्तरावर पहिल्या दहा मध्ये विद्यापीठाला स्थान मिळवून देण्याचे ध्येय

सिंधूदुर्ग : दर्जेदार शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यामुळे डॉ. बाळा साहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने शेती विकासासाठी सक्षम मनुष्यबळ, कृषी तंत्रज्ञाननिर्मितीचे उल्लेखनीय कार्य केले आहे. यापुढे कोकणातील पारंपरिक शेतीचे विज्ञानधिष्ठीत शेतीत परिवर्तन करण्यासाठी येथील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. विशेषतः "कृषी' च्या विद्यार्थ्यांनी निव्वळ नोकरीसाठी शिक्षण न घेता कृषी उद्योजक होऊन ग्रामीण भागात रोजगार निर्माण केला पाहिजे असे प्रतिपादन  नवनिर्वाचित कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी मुळदे येथे केले. डॉ. भावे म्हणाले,"राष्ट्रीय स्तरावर पहिल्या दहा मध्ये विद्यापीठाला स्थान मिळवून देण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे.  तसेच शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत कोकण कृषी विद्यापीठाचे काम पोहोचेल यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू. तरुणांसाठी आमचे व्हिजन तयार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे नवनियुक्त कुलगुरू महोदय डॉ.संजय भावे यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.विद्यार्थी विद्यार्थिनींनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात, पुष्पवृष्टी करून फटाके लावून जल्लोषात स्वागत केले. डॉ.भावे  व त्यांच्या पत्नी स्नेहल भावे यांचे विद्यार्थिनींनी औक्षण केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर यांनी कुलगुरूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कुलगुरू यांच्या शुभहस्ते प्रक्षेत्रावर नारळाच्या रोपाची लागवड करण्यात आली.  सोहळ्यासाठी व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रदीप हळदवणेकर, मत्स्य संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन सावंत, विद्यापीठ अभियंता निनाद कुलकर्णी,  महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव  विलास यादव, मुळदे गावच्या उपसरपंच अपूर्वा पालव, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सिंधुदुर्ग समाजकल्याण उपायुक्त प्रमोद जाधव आदी उपस्थित होते. डॉ.संदीप गुरव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानतंर डॉ.संदीप गुरव, प्रा. हर्षवर्धन वाघ, डॉ.जया तुमडाम, डॉ.महेश शेडगे, प्रा.प्रशांत देबाजे, डॉ.परेश पोटफोडे, डॉ.नितीन सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर व डॉ.प्रदीप हळदवणेकर यांनी डॉ.भावे स्वभावाचे विविध पैलू आपल्या मनोगतातून मांडले. महाविद्यालय परिवारातर्फे कुलगुरूंचा शाल, श्रीफळ, विद्यार्थ्यांनी तयार केलेला आकर्षक पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना  "मी या सत्काराने भारावून गेलो असे उदगार कुलगुरू डॉ. भावे यांनी काढले. उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाशी हितगुज केले. डॉ.परेश पोटफोडे यांनी आभार मानले. सूत्र संचालन डॉ.संदीप गुरव यांनी केले. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली. नवनियुक्त कुलगुरू महोदयांनी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीस भेट देऊन पाहणी केली व कामाच्या पुर्तते बाबत विद्यापीठ अभियंता यांना सूचना केल्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAgriculture Sectorशेती क्षेत्र