सावंतवाडी : ओटवणे मांडव फातरवाडी मध्ये बंद घर असल्याचा फायदा घेत अज्ञात कपाट उघडून चोरट्यानी रोख रक्कमेसह दागिने मिळून अदाज दोन ते तीन लाख रूपयांची चोरी केली. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी लागलीच ओटवणे येथे धाव घेऊन माहिती घेतली.ओटवणे येथील अरूण म्हापसेकर हे नेहमीप्रमाणे शेतीच्या कामासाठी कुटुंबासमवेत शेतावर गेले होते. घरात कोणीच नव्हते. याचाच फायदा घेत दबा धरून बसलेल्या चोरट्याने दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला व घरातील बंद कपाट उघडून दागिन्यासह रोख रक्कम लंपास केली. तसेच कपाटातील सामान विसकटून टाकले होते.
म्हापसेकर कुटुंब घरी आल्यावर त्यांना कपाट उघडे दिसले तसेच कपाटातील कपडे ही बाहेर काढून टाकले होते.त्याना हा प्रकार आपल्या नातेवाईकांच्या निर्दशनास आणून दिला त्यांनी लागलीच म्हापसेकर यांच्या घराकडे धाव घेतली तसेच याबाबत पोलिसांना माहीती दिली.म्हापसेकर यांच्या घरातील दागिन्यांसह रोख रक्कम चोरीला गेली असून, सांयकाळी उशिरापर्यत रोख रक्कम किती होती हे मात्र कळू शकले नाही. माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी ओटवणे येथे जाऊन माहिती घेतली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच स्थानिकांकडून माहिती घेतली.
ओटवणेमध्ये एवढी मोठी धाडसी चोरी होण्याची ही पहिलीच घटना असून, म्हापसेकर कुटूंबाला तर चांगलाच धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरटा कदाचित स्थानिकच असला पाहिजे, आम्ही शोध घेत असल्याचे सांगितले.