वैभववाडी : सारस्वत बँकेतील अपहार प्रकरणी पोलिसांनी वैभववाडी शाखेचे तत्कालीन सहाय्यक व्यवस्थापक कल्पेश अशोक महाडिक यांना अटक केली. त्यांच्यासह प्रमुख संशयित आरोपी प्रल्हाद मांजरेकर यांना पोलीस कोठडी मिळावी अशी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले आहे.सारस्वत बँकेच्या वैभववाडी, कणकवली शाखेतील २८ ग्राहकांच्या ३ कोटी ५१ लाख ३७ हजार रुपयांच्या ठेवी त्यांची कोणतीही पूर्व संमती नसताना बँकेचे कनिष्ठ अधिकारी तथा संशयित आरोपी प्रल्हाद मांजरेकर यांनी परस्पर काढली. यासंदर्भात काही ग्राहकांनी बँकेकडे तक्रारी नोंदविल्यानंतर बँकेने चौकशी केली. या चौकशीत अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर बँकेचे शाखा व्यवस्थापक श्रीकृष्ण वालावलकर यांनी मांजरेकर यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. मांजरेकरला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. याकाळात पोलीस तपासात बँकेचे तत्कालीन सहाय्यक व्यवस्थापक कल्पेश महाडिक यांना सहआरोपी करीत त्यांना अटक केली.मांजरेकर याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी (ता. १७) मांजरेकर आणि महाडिक यांना कणकवली न्यायालयात हजर करीत तपास पूर्ण झाला नसल्याने पोलीस कोठडी द्यावी, अशी न्यायालयाकडे मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची ही मागणी फेटाळून लावत दोघांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यामुळे दोघांनाही पोलीस कोठडी मिळावी, यासाठी पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील केले आहे. या अपहारप्रकरणाचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.
बँक अपहारप्रकरणी तत्कालीन सहाय्यक व्यवस्थापकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 10:11 PM
सारस्वत बँकेतील अपहार प्रकरणी पोलिसांनी वैभववाडी शाखेचे तत्कालीन सहाय्यक व्यवस्थापक कल्पेश अशोक महाडिक यांना अटक केली. त्यांच्यासह प्रमुख संशयित आरोपी प्रल्हाद मांजरेकर यांना पोलीस कोठडी मिळावी अशी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले आहे.
ठळक मुद्देबँक अपहारप्रकरणी तत्कालीन सहाय्यक व्यवस्थापकास अटकपोलीस कोठडीसाठी अपील : दोन्ही संशयितांना न्यायालयीन कोठडी