मालवण : पुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभाराबाबत तालुका धान्य व केरोसीन दुकानदारांच्या सभेत दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. धान्य किंवा केरोसीन दुकानदार हा फक्त कमीशन एजंट असुन त्याचे काम धान्य किंवा केरोसीन उचल करणे आणि वितरण करणे एवढेच असल्याने कोणतेही शासनाचे काम लादले जावू नये. जबरदस्तीने काम लादले गेल्यास दुकानदार टोकाची भुमिका घेतील, असा इशारा धान्य व केरोसीन दुकानदारांनी सभेत दिला.मालवण तालुका धान्य व केरोसीन दुकानदारांची सभा मेढा येथील धान्य दुकानदार विजय पेडणेकर यांच्या निवासस्थानी झाली. या सभेला धान्य व केरोसीन संघटना अध्यक्ष सुनिल मलये, उपाध्यक्ष बापू देसाई, विलास पांजरी, सुहास हडकर, अमित गावडे, दादा कुशे, विजय पेडणेकर, बाबू लुडबे, बाळा चव्हाण, दादा मांजरेकर, तेजस शिरोडकर, चंद्रकांत गावडे, भगवान टक्के, विश्वनाथ भाटकर, विलास धुरी, लक्ष्मीकांत परब, सुभाष गिरकर, राजन मांजरेकर, संदिप परब, विसु पालव, सत्यविजय ढोलम, प्रशांत मलये, विरेश पाताडे, अमित प्रभुदेसाई आदी विक्रेते उपस्थित होते.धान्य दुकानदार हा कमिशन एजंट असताना त्याच्यावर शिधापत्रिकाधारकांचे हमीपत्र, ई-केवायसी, व्हेरीफीकेशन करणे ही शासकीय कर्मचा?्यांची कामे धान्य दुकानदारावर जबरदस्तीने लादली जात आहेत. यापुढे ती लादता नये असा इशारा देण्यात आला. मागील केलेल्या कामांचा मोबदला शिधापत्रिकेमधील प्रती व्यक्ती २० रुपए मोबदला देण्यात यावा अशी भूमिका यावेळी दुकानदारांनी घेतली.शिधापत्रिकांची माहीती शिधापत्रिकेप्रमाणे मशिनवर आॅनलाईन दिसत नाही त्यात असंख्य चुका आहेत. बरीच नावे गायब झाली आहेत. शासनाने सर्व त्रुटी दुर कराव्यात. धान्य वितरणा व्यतिरिक्त कोणतीही माहीती मागुन त्रास देवू नये असा इशाराही दुकानदारांनी पुरवठा विभागाला दिला.धान्यदुकानदारांच्या मागण्याशासनाकडुन धान्यदुकानदारांना फक्त ७५ टक्के धान्याचा पुरवठा होतो. त्यामुळे धान्यापासुन वंचीत राहीलेल्या २५ टक्के कार्डधारकांच्या रोषास धान्यदुकानदाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे यापुढे १०० टक्के धान्यवितरण व्हावे अशी मागणी करण्यात आली. शासनाकडुन केरोसिन पुरवठा १०० टक्के केला जात नाही तसेच कार्डधारकांना वितरीत करायच्या प्रमाणाची लेखी प्रत प्रत्येक केरोसीन वितरकाला देण्यात यावी. यापुढे फेब्रुवारी २०१९ पासुन जर मागणीप्रमाणे १०० टक्के केरोसीन पुरवठा न झाल्यास एकही केरोसीन वितरक दुकानात केरोसीन उतरून घेणार नाही.
...तर धान्यदुकानदार टोकाची भुमिका घेतील, संघटनेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 1:49 PM
पुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभाराबाबत तालुका धान्य व केरोसीन दुकानदारांच्या सभेत दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. धान्य किंवा केरोसीन दुकानदार हा फक्त कमीशन एजंट असुन त्याचे काम धान्य किंवा केरोसीन उचल करणे आणि वितरण करणे एवढेच असल्याने कोणतेही शासनाचे काम लादले जावू नये. जबरदस्तीने काम लादले गेल्यास दुकानदार टोकाची भुमिका घेतील, असा इशारा धान्य व केरोसीन दुकानदारांनी सभेत दिला.
ठळक मुद्दे ...तर धान्यदुकानदार टोकाची भुमिका घेतील, धान्यदुकानदार संघटनेचा इशाराआमच्यावर जबरदस्तीने कामे लादली जाऊ नयेत!