सावंतवाडी : संपूर्ण राज्यातच कायदा सुव्यवस्था ढासळली असल्यानेच कोणाचा धाक राहिला नसल्याने सावंतवाडी पोलिस ठाण्यात जो प्रकार घडला तशीच परिस्थिती सर्वत्र आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी गृहविभागावर टीकास्त्र सोडले.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रविण भोसले, व्हिक्टर डॉन्टस, माजी मंत्री प्रविण भोसले, अर्चना घारे-परब प्रसाद रेगे, अनंत पिळणकर आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले, सरकाराला जनतेचे देणे घेणे राहिले नाही. रूग्णालयात एवढे मृत्यू होतात त्याबद्दल कोण बोलायला तयार नाहीत. अशी खंत व्यक्त करत एखादा विषय पुढे करायचा आणि त्यावर चर्चा घडवून आणायची ऐवढेच फक्त सुरू आहे. पण जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात सुप्त लाट आहे. ती नक्कीच निवडणुकीतून व्यक्त होईल.शरद पवार यांनी परतीचे दोर कधीच कापले
राष्ट्रवादी काँग्रेस मधून जे फुटून गेले त्याच्या परतीचे दोर शरद पवार यांनी कधीच कापले आहेत त्यामुळेच त्यांना आता पुन्हा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण आम्ही शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ आहोत त्यातील काही जणांना अजित पवार गट आमिषे दाखवत आहे. पण त्याचा कोणताही उपयोग होणार नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
अन्यथा तसे प्रकार सर्वत्र घडतील ज्या ठिकाणी पोलिसांची कंत्राटी पध्दतीने भरती होणार आहे. मग राज्यात कायदा सुव्यवस्था काय राहणार आहे. कोणाचा कुणावर धाक राहणार नाही हा निर्णय चूकीचा आहे. जनतेला न परवडणारा आहे. अन्यथा सावंतवाडीत जसा लाचलुचपतचा प्रकार घडला तसेच प्रकार सर्वत्र घडतील या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ही त्यांनी केली.मी अहवाल देईन पण पक्षच निर्णय घेईलमाजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना सावंतवाडी मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार का असे विचारले असता मी माझा अहवाल पक्षाला देईन पण निर्णय हा वरिष्ठ नेतृत्व घेणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा सुरू झाली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.