शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

‘सी-वर्ल्ड’ हलविण्याचा निर्णय नाही

By admin | Published: September 04, 2016 11:28 PM

दीपक केसरकर : युतीचा निर्णय पक्षप्रमुख घेणार

 सावंतवाडी : सीवर्ल्ड प्रकल्प देवगडला हलवण्याबाबतची घोषणा खासदार विनायक राऊत यांनी केली असली, तरी राज्य शासनाचा अद्याप असा कोणताही निर्णय झाला नाही. तसेच हा प्रकल्प अद्यापपर्यत तोंडवली वायंगणी येथेच आहे, असे मत सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. आगामी नगरपालिका निवडणुकामध्ये युती करण्याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरेच निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार विनायक राऊत यांनी वायंगणी-तोंडवली येथील ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प देवगड येथे हलविण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यावर मंत्री केसरकर म्हणाले, सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत अद्याप राज्य शासनाचा कोणताही निर्णय झाला नाही. खासदार विनायक राऊत यांनी माझ्याशी या प्रकल्पाबाबत चर्चा केली नाही. आम्ही एकत्र भेटलो की याबाबत चर्चा करु. वायंगणी-तोंडवली प्रकल्प हलविणे हा शेवटचा उपाय असून, आम्ही ग्रामस्थांच्या मागणीनुसार १४०० एकरवरून हा प्रकल्प साडेतीनशे एकरमध्ये करण्याचे ठरवले आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. अनेक गावांना आम्ही पर्यटनमधून निधी देत आहोत. तिलारीला आतापर्यंत कधीही पर्यटनासाठी निधी देण्यात आला नव्हता, तेवढा निधी यावेळी शासनाने दिला आहे. आंबा नुकसानीची कधी नाही तेवढी मदत यावेळी देण्यात आली. आम्हाला जिल्ह्याचा विकास करायचा असून, हा विकास शांततेच्या मार्गातून करायचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यातून रोजगार निर्मितीही होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) ताज प्रकल्पाच्या जमिनीबाबत आठवडाभरात निर्णय वेळागर येथील तीन जमिनी वेगवेगळ्या उद्योजकांना पंचतारांकित हॉटेल बांधण्यासाठी देण्यात आली होत्या. त्यातील एका कंपनीने हॉटेल बांधले आहे. मात्र, ताज व ओबेरॉयने अद्याप हॉंटेल बांधली नाहीत. ओबेरॉयच्या जमिनीवर एमटीडीसी प्रकल्प उभारत आहे. तर ताजच्या जमिनीबाबत येत्या आठवडाभरात निर्णय घेतला जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले. या जमिनी विकासासाठी दिल्या, तेथे प्रकल्प उभे राहिले पाहिजेत ही आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. नगरपालिकेबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेतील सावंतवाडी नगरपालिका निवडणुका होण्यास अद्याप वेळ आहे. मात्र, उमेदवार ठरविणे, युती करणे याबाबतचा निर्णय आमच्या पातळीवर होणार नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे निर्णय घेणार आहेत, असे मत केसरकर यांनी मांडले. तसेच विकासकामे केल्याने आम्हालाच पंसती मिळेल, असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.