शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

आहार शिजवण्याचा परवानाच नाही

By admin | Published: August 19, 2015 11:41 PM

गांभीर्यच संपले : बचत गटांबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा हलगर्जीपणा?

श्रीकांत चाळके- खेड रत्नागिरी जिल्ह्यात शेकडोंच्या पटीत महिला बचतगट आहेत़ यातील १५०च्या आसपास महिला बचतगट बऱ्यापैकी सक्षम आहेत. याच गटांना शालेय पोषण आहार शिजविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, यापैकी केवळ २५ टक्के बचत गटांकडेच अन्न व औषध प्रशासनाकडील परवाना असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.उर्वरीत बचतगटांनी आपली कागदपत्रेच सादर न केल्याने त्यांना परवाना देण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे़ यामध्ये शिक्षण विभागाचा हलगर्जीपणाच दिसून येत असल्याचे बोलले जात आहे़महाराष्ट्रात काही ठिकाणी शालेय पोषण आहार योग्यप्रकारे तसेच व्यवहार्यपणे शिजवून देणे हे बचत गटांना अनिवार्य आहे. मात्र, तसे दिले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. बिहारमधील पोषण आहारात झालेल्या विषबाधेच्या घटनेनंतर राज्य सरकारने सर्वत्र सतर्कतेच्या सुचना दिल्या असल्या तरीही शिक्षण विभागाने आतापर्यंत याप्रकरणी गांभीर्याने दखल घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.सर्वसामान्य मुलांना दर्जेदार आहार देण्याबरोबरच मुलांची शाळेतील पटसंख्या वाढविणे आणि मध्यान्नच्या सत्रात जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, हा आहार आता दुपारच्या सुट्टीत दिला जात आहे. यामुळे वर्गखोलीत असलेल्या शाळातील शिक्षकांचीही चांगली बडदास्त ठेवली जात असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे शालेय समितीचा जो अध्यक्ष आहे, त्याच्या पत्नीलाच हा आहार शिजवून देण्याचे कंत्राट काही शाळेतून दिल्याचे सांगण्यात येत आहे़ मुलांच्या नावाखाली शाळेतील शिक्षकही दुपारचे जेवण करीत असून, खेड तालुक्यात असे विचित्र प्रकार राजरोस सुरू आहेत.शालेय पोषण आहार शिजविण्याचे कंत्राट यापूर्वी खाजगी लोकांनाच दिले जात होते. त्यानंतर महिला बचतगटांना हे कंत्राट देण्यात आले. सध्या मात्र शासनाने हे कंत्राट आता मदतनीसांनाच दिले आहे. मदतनीस शालेय पोषण आहार शिजवून देणार आहेत.जिल्ह्यात हा आहार ३ हजार १०७ शाळांमध्ये पोषण आहाराचे वाटप केले जात आहे. याचा लाभ जिल्हयातील इयत्ता पहिली ते पाचवीतील १ लाख १ हजार ८९ तर सहावी ते आठवीमधील ७२ हजार ६७४ इतक्या विद्यार्थ्यांना मिळत आहे. असे असले तरी या बचतगटांना अन्न व औषध प्रशासनाकडील परवाना बंधनकारक केलेला आहे. गतवर्षी जिल्ह्यात ५ हजार १३६ मदतनीसांची नियुक्ती करण्यात आली होती तर १४४ गटांपैकी २५ टक्के गटांनी आहार शिजवून देण्याचा परवाना घेतला आहे. उर्वरीत गटांनी परवाना आवश्यक असतानाही न घेतल्याने शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.पोषण आहारासारख्या संवेदनशील विषयाबाबतही जिल्हा परिषद गांभीर्याने वागत नसल्याचे पुढे आले आहे. अशा बचत गटांनी त्यांची कागदपत्रेच सादर केली नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे त्यांना असा परवाना अद्यापपर्यंत मिळालेला नसल्याचे कळते.