कणकवली : किसान क्रेडिट कार्ड योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वर्धापन दिनापासून राबविणार अशी घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक वर्धापन दिन सोहळा एकमेकांना जोडून सतीश सावंत आपली प्रसिद्धीची हौस पुरवून घेत आहेत, अशी टीका जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजपा नेते अतुल काळसेकर यांनी केली.किसान क्रेडिट कार्डमधून मच्छिमार, शेळीमेंढी पालन करणारे व्यावसायिक, दुग्ध व्यावसायिक यांना जिल्हा बँकेच्या वर्धापन दिनापासून कर्जपुरवठा केला जाईल असे सतीश सावंत यांनी जाहीर केले आहे. त्यावरून काळसेकर यांनी सावंत यांच्यावर टीका केली. कणकवली येथील भाजपा संपर्क कार्यालयात ते बोलत होते़ यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर सावंत, मधुसूदन बांदिवडेकर, महेश सारंग, अमोल तेली आदी उपस्थित होते.अतुल काळसेकर म्हणाले, किसान क्रेडिट कार्ड योजना ही केंद्राची योजना आहे. सर्वसामान्यांसाठी असलेल्या विविध विमा योजना, शेतकऱ्यांसाठीची पंजाबराव देशमुख कृषी योजना, पीक विमा कर्ज योजना या सर्व केंद्र सरकारच्याच योजना असून त्या किसान क्रेडिट कार्डमध्ये अंतर्भूत केल्या आहेत.जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी केंद्राच्याच योजना राबवित आहे. या योजनांमधून सात टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. या सात टक्क्यांतूनही तीन टक्के केंद्र सरकारच्या वाट्याचे व्याज केंद्र सरकारने माफ करून शेतकºयांना कसा अधिक दिलासा मिळेल हे पाहिले आहे.जिल्हा बँकेचा एक टक्का सोडला, तर राज्याचे तीन टक्के व्याज शिल्लक राहतेच. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सत्ताधारी तिघाडी राज्य सरकारचे प्रतिनिधी आहेतच. तेव्हा हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या राज्यसरकारकडून तीन टक्के व्याज माफ करून दाखवावे. शेतकऱ्यांना त्यातून आवश्यक दिलासा नक्कीच मिळेल.शेतकºयांसाठी काहीच न करणाऱ्या राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाचा पैसा द्यायचा आणि आज सर्व योजना ज्या केंद्राच्या पैशातून बँक राबवित आहे, त्या केंद्राच्या पीएम केअरला मदत नाकारायची ही उफराटी विश्वासघातकी रित, हीच सावंत यांची संस्कृती आहे. केवळ राज्य सरकारला खूष करीत राजकीय मलिदा लाटण्यासाठी सतीश सावंत जिल्हा बँकेचा गैरवापर करीत आहेत, अशी टीकाही अतुल काळसेकर यांनी केली आहे....तर काजू उत्पादकांना आधार मिळाला असताशेतकऱ्यांचा कैवारी म्हणून मिरवणारे सतीश सावंत हे पत्रकार परिषदा घेण्याव्यतिरिक्त काहीही करीत नाहीत. काजू व्यावसायिकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावरही त्यांनी निव्वळ राजकारण आणि पत्रकबाजीच केली. फडणवीस सरकारच्या काळात काजूसाठी मंजूर झालेले शंभर कोटी रुपये मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या राज्य सरकारकडे प्रयत्न केले असते, तर काजू उत्पादक शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळात मोठा आधार मिळाला असता, असेही काळसेकर म्हणाले.
ते प्रसिद्धीची हौस भागवून घेताहेत : अतुल काळसेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:47 AM
किसान क्रेडिट कार्ड योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वर्धापन दिनापासून राबविणार अशी घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक वर्धापन दिन सोहळा एकमेकांना जोडून सतीश सावंत आपली प्रसिद्धीची हौस पुरवून घेत आहेत, अशी टीका जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजपा नेते अतुल काळसेकर यांनी केली.
ठळक मुद्देते प्रसिद्धीची हौस भागवून घेताहेत : अतुल काळसेकर सतीश सावंत यांच्यावर किसान क्रेडिट कार्डबाबत टीका