कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेले कोरोना स्वॅब कलेक्शन सेंटर अखेर शासकीय विश्रामगृहावर स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या व कोरोना सदृश लक्षणे असणाऱ्यांची चाचणी करण्याकरिता घेण्यात येणारे स्वॅब हे यापूर्वी कणकवली विश्रामगृहावर घेण्यात येत होते. मात्रए काही महिन्यांपूर्वी हे स्वॅब कलेक्शन सेंटर वरिष्ठांच्या आदेशानुसार कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या हायरिक्समध्ये येणाऱ्या व्यक्तींना व कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांना स्वॅब देण्याकरिता उपजिल्हा रुग्णालयात जावे लागत होते.कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरणासाठी होणारी गर्दी व स्वॅब देण्यासाठी होणारी गर्दी यामुळे तिथे कोरोना संसर्गाचा धोका वाढला होता. अखेर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेले स्वॅब कलेक्शन सेंटर कणकवली विश्रामगृहावर बुधवारपासून स्थलांतरित करण्यात आले.
ते स्वॅब कलेक्शन सेंटर विश्रामगृहावर स्थलांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 3:36 PM
CoronaVirus Kankavli Hospital Sindhudurg : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेले कोरोना स्वॅब कलेक्शन सेंटर अखेर शासकीय विश्रामगृहावर स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
ठळक मुद्देते स्वॅब कलेक्शन सेंटर विश्रामगृहावर स्थलांतरित नागरिकांमध्ये समाधान : एकाच ठिकाणी होत होते लसीकरण, तपासणी