शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘ते’ चोरटे गुन्हेगारी प्रवृत्तीचे

By admin | Published: August 04, 2015 11:51 PM

आॅपरेशन आॅल आऊट : अद्याप सहा जणांना पकडण्यात अपयश

अनंत जाधव - सावंतवाडी--सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांची झोप उडवून देणाऱ्या तीन चोरट्यांना पकडून पोलिसांनी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ मोहीम फत्ते केली. तरी अद्याप सहा चोरट्यांना पकडण्यात जिल्ह्यातील पोलिसांना यश आले नाही. या चोरट्यांनी गेल्या वर्षीही चोऱ्या केल्या आहेत. हे आता पोलीस तपासात पुढे येत आहे. यातील सुरेश मदोरिया याने तर मध्यप्रदेशमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केला होता. त्यापासून तो फरार असून मुंबई, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यात या टोळीने चोऱ्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल शंभर ते दीडशे चोऱ्या करून पोलिसांची झोप उडवणारी ही टोळी मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील भिल्ल समाजातील आहे. टोळीचा पूर्वंपार चोरी हाच व्यवसाय आहे. यात नऊ जण कार्यरत आहे. टोळीने गेल्या काही वर्षात गुजरात, मुंबई, मध्यप्रदेश आदी ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. या टोळीतील सुरेश सुभान मादोरिया हा हा मास्टर मार्इंड आहे. सावंतवाडी पोलिसांनी या चोरट्याला वेगळीकडे, तर मोहर्निया अजनार व रमेश अजनार या दोघांना वेगळ्या कोठडीत ठेवले आहे. यात सुरेश याने तर वयाच्या २२ व्या वर्षी मध्यप्रदेशात एका पोलीस अधिकाऱ्यावरच गोळीबार केला होता. त्यात हा पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून सुरेश हा फरार असून तो चार-पाच वर्षांपासून चोरट्यांच्या टोळक्यात सामील झाला आहे. अनेक वर्षे तो मध्यप्रदेश पोलिसांना चकवा देत असून मध्यप्रदेश पोलिसांनाही तो हवा आहे. ही टोळी मध्यप्रदेशातील भिल्ल समाजातील असून त्यांचे गाव जंगल परिसरात असल्याने स्थानिक पोलीसही या गावामध्ये जाण्यास बरेच घाबरतात. याचाच फायदा ही टोळी घेते. या टोळीने २०१३ पासून सिंधुदुर्गमध्ये बंद घरे हेरण्यास सुरुवात केली होती. त्यातून ते छोट्या-मोठ्या चोऱ्या करीत असत. पण पोलिसांना सापडत नव्हते. त्यामुळे त्यांनी यावर्षी महामार्गावरची गावे निवडली. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी व बांदा या चार ठिकाणी त्यांनी बंद घरे फोडली. गोवेकर यांच्या घरातील पाच लाखांवर डल्लामाजगाव-गरड भागात असलेल्या सुभाष गोवेकर यांच्या घरातील पाच लाखाची रोकड लंपास झाल्याची तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद असून, ही चोरीही याच चोरट्यांनी केली आहे. दिवसा गोवेकर राहत असलेल्या कॉलनीतून फेरफटका मारल्यानंतर घर बंद दिसले म्हणून त्यांनी मध्यरात्री २ च्या सुमारास या घरात प्रवेश केला. ज्यावेळी पोलिस खाली सही मारण्यासाठी आले होते, त्यावेळी ही टोळी चोरी करीत होती, असे तपासात पुढे आले आहे.चोरट्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय आखले होते. सावंतवाडी, कुडाळ व कणकवलीतील रेल्वेस्थानके पळण्यासाठी वापर करत होते.पोलिसांच्या प्रयत्नांना यशचोरट्यांची ही टोळी गेली दोन वर्षे सिंधुदुर्ग पोलिसांची झोप उडवत आहे. सिंधुदुर्ग चोरी करण्यासाठी सुरक्षित असल्याचे त्यांना वाटत होते. यावर्षी पोलिसांनी फास आवळला आणि तिघांना पकडण्यात यश मिळवले. त्यामुळे आता सिंधुदुर्गमध्ये चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. चोरट्यांची ही टोळी गेली दोन वर्षे सिंधुदुर्ग पोलिसांची झोप उडवत होती. त्यांच्यादृष्टीने सिंधुदुर्ग चोरी करण्यासाठी सुरक्षित असल्याचे त्यांना वाटत होते. पण यावर्षी पोलिसांना यश आले. त्यामुळे आता सिंधुदुर्गमध्ये चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. पोलीस आता त्यादृष्टीने तपासात अग्रेसर झाले आहेत.दिवसभर एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी फिरून बंद घरे शोधून काढत असत आणि रात्रीच्या वेळी ते चोऱ्या करीत होते. अनेकवेळा त्यांना पोलिसांनीही हटकले होते. पण त्यांनी पोलिसांना मागमूसही लागू दिला नाही, हे विशेष.