मालवण : शहरातील पोस्ट कार्यालयानजीक राहणाऱ्या प्रसाद श्रीकांत सावंत यांच्या बंद घराची कौले काढून आतील कपाट फोडून रोख ३१ हजार ५०० रुपये, सोन्याची साखळी व अंगठी असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना २४ नोव्हेंबरला घडली. याबाबतची तक्रार सावंत यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली असून तीन संशयितांची नावे दिली आहेत. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.मालवण पोस्ट कार्यालयानजीक राहणारे प्रसाद सावंत हे न्यायालयाच्या कामानिमित्त २३ रोजी मुंबई येथे गेले होते. ते माघारी परतल्यानंतर त्यांनी घराचे कुलूप उघडले असता अज्ञातांनी घराची कौले काढून आत प्रवेश केल्याचे दिसून आले. त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता दगडाने कपाट फोडून आतील लक्ष्मीपूजनाची गेली पंधरा वर्षे साठविलेली ३१ हजार ५०० रुपयांची रक्कम, १८ ग्रॅमची सोन्याची साखळी, साडेसहा ग्रॅमची सोन्याची अंगठी तसेच अन्य कागदपत्रे चोरीस गेल्याचे दिसून आले.त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत चोरीची तक्रार दिली आहे. यात त्यांनी तीन जणांवर चोरीचा संशय व्यक्त केला असून त्यांची नावेही पोलिसांना दिली आहेत. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.रेल्वे प्रवाशाचा मृत्यूकणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील नेत्रावती एक्स्प्रेसमधून केरळच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे कणकवली रेल्वेस्थानकात गाडी थांबवून त्या प्रवाशाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तो प्रवासी मृत झाला. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.नेत्रावती एक्स्प्रेसमधून रमण शंकरण कुट्टी (६४, रा. सांताक्रुझ, मुंबई) हे गुरुवारी प्रवास करीत होते. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. तसेच त्यांच्या तोंडामधून फेसही आल्यामुळे सोबतच्या प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्याला त्याची माहिती दिली. त्यांनी कणकवली स्टेशनमास्तरांना कळविले. तसेच रेल्वे सुरक्षा बलाला त्याची माहिती देण्यात आली.कणकवली येथे ती रेल्वे थांबविण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान राजेश कांदळगावकर यांनी तत्काळ सहकाऱ्यांच्या मदतीने त्या प्रवाशाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, उपचारापूर्वीच तो प्रवासी मृत झाल्याचे तेथील डॉक्टरनी सांगितले. या घटनेबाबत कणकवली पोलिसांना कळविण्यात आले. त्यांनी त्या प्रवाशाच्या भावाशी संपर्क करून माहिती दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
बंद घराची कौले काढून चोरांनी कपाट फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 11:41 AM
मालवण शहरातील पोस्ट कार्यालयानजीक राहणाऱ्या प्रसाद श्रीकांत सावंत यांच्या बंद घराची कौले काढून आतील कपाट फोडून रोख ३१ हजार ५०० रुपये, सोन्याची साखळी व अंगठी असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना २४ नोव्हेंबरला घडली. याबाबतची तक्रार सावंत यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली असून तीन संशयितांची नावे दिली आहेत. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देबंद घराची कौले काढून चोरांनी कपाट फोडले मालवणातील घटना : रोख रक्कम लंपास