शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

तारली गोळा करण्यासाठी उजाडला तिसरा दिवस, जेसीबीच्या सहाय्याने मासळी ओढण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 7:50 PM

मालवण : ओखी चक्रीवादळानंतर समुद्रात मासेमारीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वायरी येथील नारायण तोडणकर रापण संघाच्या रापणीत रविवारी मोठ्या प्रमाणात तारली मासळीची मिळाली.

मालवण : ओखी चक्रीवादळानंतर समुद्रात मासेमारीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वायरी येथील नारायण तोडणकर रापण संघाच्या रापणीत रविवारी मोठ्या प्रमाणात तारली मासळीची मिळाली. किना-यावर ओढण्यात येणारी मासळी गोळा करण्याचे काम दुस-या दिवशी म्हणजेच सोमवारीही सुरूच होते. एक ते दीड किलोमीटर लांबीच्या परिसरात सापडलेली मासळी गोळा करून मच्छीमार हैराण झाले तर रात्रभर मासळी गोळा करून मच्छीमार दमल्याने परप्रांतातील कामगारांना मासळी गोळा करण्यासाठी बोलाविण्यात आले होते. तोडणकर यांच्या रापणीस सुमारे तीनशेहून अधिक खंडी तारली मासळी मिळाली. या मासळीमुळे रापणकर संघास लाखो रुपयांचे चांगले उत्पन्न मिळाले आहे.किनारपट्टी भागातील रापणकर मच्छीमारांच्या होड्यांचे तसेच जाळ्यांचे ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झाले होते. वादळाच्या काळात मासेमारी बंद असल्याने त्यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्नही निर्माण झाला होता. मात्र समुद्रातील वातावरण निवळल्यानंतर मच्छीमार नव्या जोमाने मासेमारीस उतरला. यात पहिल्याच टप्प्यात वायरी येथील नारायण तोडणकर यांच्या रापणीस रविवारी तारली मासळीचा बंपर मिळाला.रात्रभर मासळी ओढून ती वाहनांमधून पाठविण्यासाठी प्रथमच जेसीबीचा वापर करण्याची वेळ मच्छीमारांवर आली. उर्वरीत मासळी गोळा करण्यास आणखी एक दिवस लागेल, अशी परिस्थिती आहे. नारायण तोडणकर रापण संघाच्या जाळ्या पाठोपाठ मेस्त रापणकर संघाची रापण असून ती ओढायची बाकी आहे. मात्र तोडणकर यांच्या रापणीस मिळालेली मासळी गोळा करण्यास आणखीन एक लागणार आहे. त्यानंतर मेस्त यांची रापण ओढण्यात येणार असल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.दुर्गंधीचे साम्राज्यमच्छीमारांच्या जाळीत अनपेक्षित तारली मासळी मिळाली. ही मासळी निर्यात केली जात असून, मासळी वाहतूक करणा-या वाहनातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली जात आहे. किनारपट्टीवर तारली मासळीचा खच असल्याने खराब झालेल्या मासळीला प्रचंड दुर्गंधी येत आहे. तर मालवण- कसाल व मालवण वेंगुर्ले तसेच मावळण-कुडाळ या मार्गावर मासळी वाहतूक होणा-या वाहनांतून मासळीच्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अजूनही काही दिवस दुर्गंधी रस्त्यावरील नागरिकांना सहन करावा लागणर आहे.