सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर आता तिसºया डोळ्याची (सीसीटिव्ही कॅमेरे) नजर असणार आहे. एकूण ४ कोटी ९८ लाख रुपये खर्चून जिल्ह्यातील ९३ ठिकाणी २८० सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या प्रयत्नातून ही सुरक्षितता प्रत्यक्षात आली आहे.संपूर्ण जिल्हाभरात लावण्यात आलेल्या या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांमुळे आता जिल्हा अधिक सुरक्षित झाला आहे. तसेच यामुळे पर्यटन व्यवसाय वाढीसाठी मदत होणार आहे.कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, साटेली-भेडशी, बांदा, देवगड- जामसंडे, वैभववाडी, मालवण अशा शहरात एकूण ५९ ठिकाणी कॅमेरे आहेत. तर म्हापण, परुळे, पाट, आंबोली, मळगाव, वेताळबांबर्डे, पणदूर, कसाल, आचरा, कुणकेश्वर, शिरगांव, नांदगाव, भुईबावडा, पडेल या १८ ठिकाणीही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील ६ रेल्वे स्टेशन, ३ जेटी, ७ तपासणी नाके हेही आता सीसीटिव्हीच्या नजरेत आले आहेत. बसविण्यात आलेल्या कॅमेºयांपैकी २१० कॅमेरे हे ४ मेगापिक्सल नाईटव्हीजन बुलेट प्रकारातील आहेत. तर ३० कॅमेरे हे ४ मेगापिक्सल रंगीत नाईटव्हीजन बुलेट कॅमेरे प्रकारातील आहेत. तर स्वयंचलित वाहन क्रमांक ओळखणारे नाईटव्हीजन कॅमेरे ४० आहेत. या संपूर्ण प्रकल्पाची साठवण क्षमता सहाशे टेराबाईट्स असून ४५ दिवसांपर्यंत साठवण करता येते. जिल्हा नियंत्रण कक्ष तसेच पोलीस ठाणे पातळीवर लाईव्ह कॅमेºयाद्वारे देखरेख व प्लेबॅकची सुविधा आहे. या प्रणालीचा लोकार्पण सोहळा मंगळवार २८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
रस्त्यांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर, जिल्ह्यात ९३ ठिकाणी २८० सीसीटिव्ही कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 2:50 PM
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर आता तिसºया डोळ्याची (सीसीटिव्ही कॅमेरे) नजर असणार आहे. एकूण ४ कोटी ९८ लाख रुपये ...
ठळक मुद्दे जिल्ह्यात ९३ ठिकाणी २८० सीसीटिव्ही कॅमेरेपोलीस अधीक्षकांच्या प्रयत्नातून सुरक्षितता प्रत्यक्षात